शहरं
Join us  
Trending Stories
1
Trump Putin Call: '...तोपर्यंत युद्ध थांबवणार नाही'; व्लादिमीर पुतीन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना ठणकावलं
2
अमित शाह पुणे दौरा: झाडाझडतीत तरुणाकडे मिळाले पिस्तुल, पोलिसांनी केले जप्त
3
Pune Accident Video: कार थांबली, ते जवळ गेले अन् पाठीमागून...; काळजाचा ठोका चुकवणारा अपघात
4
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट ओपनिंग; सेन्सेक्स ७० अंकांनी वधारला, मेटल-ऑटो शेअर्समध्ये घसरण
5
BJP New President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष महिला? निर्मला सितारामन यांच्यासह 'ही' ३ नावे चर्चेत!
6
महाराष्ट्रात रजिस्ट्रेशन, चालवली बंगळुरूत; फरारीच्या मालकाला भरावा लागला १.४२ कोटींचा टॅक्स; प्रकरण काय?
7
Post Office च्या PPF स्कीममध्ये महिन्याला ₹२००० जमा कराल तर १५ वर्षांनंतर किती रक्कम मिळेल, पैसेही राहतील सुरक्षित
8
One Big Beautiful Bill Passed : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय, अमेरिकेच्या संसदेत 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; नेमकं काय आहे यात?
9
शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर पती पराग त्यागीची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट, म्हणाला- "आजूबाजूच्या अफवांमध्ये.."
10
"गरीब हिंदूंना कशाला मारताय? हिंमत असेल तर नळबाजार, मोहम्मद अली रोड येथे जाऊन…’’, नितेश राणेंनी दिलं आव्हान 
11
"एअर इंडियाने कोलंबोला जातोय, इच्छापत्र बनवून ठेवलंय...", प्रसिद्ध अभिनेत्याने शेअर केला Video
12
Today Daily Horoscope: कोणत्या राशीला आज धनलाभाचा योग? जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
13
‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ विजेत्या गावांना प्रत्येकी २५ लाख; ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची घोषणा
14
पदवी आहे, पण काम भलतेच! नोकरीचे वास्तव; पीरियॉडिक लेबर फोर्स सर्व्हेमधून समोर
15
रायकर पाड्यातील विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्यासाठी जीवघेणा प्रवास; वैतरणा नदी तराफ्यावरून करावी लागते पार
16
पुणे हादरले : घरात घुसून तरुणीवर बलात्कार, तिच्याच मोबाइलवर काढले फोटो ; संगणक अभियंता तरुणी राहात होती उच्चभ्रू सोसायटीत
17
उद्धव-राज : जुन्या जखमांचा हिशेब कसा होणार?
18
यूपीतील शेतकऱ्यांच्या नावे नांदेडमध्ये पीक विमा; ४० सुविधा केंद्र चालकांवर गुन्हा; त्यात ९ जण परळीचे
19
कार चालकाची चूक असल्यास भरपाई मिळणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने दिले निर्देश
20
लंडनची डॉक्टर मैत्रीण पोलिसांच्या रडारवर; दादरमधील अत्याचार प्रकरणातील शिक्षिकेच्या वैद्यकीय चाचण्या पूर्ण; १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

गंगाबाई रूग्णालयात डुकरांचा शिरकाव

By admin | Updated: May 12, 2014 23:50 IST

संपूर्ण जिल्ह्यात महिला व बालकांसाठी केवळ एकच शासकीय रूग्णालय बाई गंगाबाई महिला रूग्णालय आहे. हे रूग्णालय जिल्ह्याच्या ठिकाणी म्हणजे

गोंदिया : संपूर्ण जिल्ह्यात महिला व बालकांसाठी केवळ एकच शासकीय रूग्णालय बाई गंगाबाई महिला रूग्णालय आहे. हे रूग्णालय जिल्ह्याच्या ठिकाणी म्हणजे गोंदिया शहरात आहे. जिल्हाभरातील महिला व बालकांना येथे उपचारासाठी आणले जाते. परंतु या रूग्णालयाची दशा पाहून येथे येणार्‍यांना ‘हेच का ते एकमेव रूग्णालय’ असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. सध्या या रूग्णालयाच्या आवारात डुकरे शिरकाव करीत आहेत. त्यामुळे रूग्ण व त्यांच्या नातलगांना मोठाच त्रास होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

बाई गंगाबाई महिला रूग्णालयात प्रसूतीसाठी गरोदर महिला दाखल होतात. त्यांच्यासह त्यांचे नातलगही येथे येतात. प्रसूती होईपर्यंत किमान दिवस नातलगांनाही येथे रहावे लागते. रोज सकाळी उठून आंघोळ करून कपडेही धुवावे लागते. मात्र शहरात फिरणारी मोकळी डुकरे आता गंगाबाई रूग्णालयात शिरकाव करू लागली आहेत. या प्रकाराकडे रूग्णालयाच्या अधिकारी वर्गांचे दुर्लक्ष आहे. डुकरांच्या हैदोसामुळे रूग्ण व त्यांचे नातलग त्रस्त होवून गेले आहेत. डुकरांनी त्रास देण्याचा सपाटा सुरू केला असून आता ही नित्याची बाब झाली आहे. डुकरांना पळविण्यासाठी या रूग्णालयात कसलीही व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे डुकरे या रूग्णालयाच्या आवारात बिनधास्तपणे फिरताना दिसतात. एकीकडे रूग्णाच्या नातलगांना रूग्णांच्या देखरेखीसाठी कसरत करावी लागते, तर दुसरीकडे आपले सामान-साहित्य डुकरांपासून वाचविण्यासाठी धावपळ करावी लागते. बाई गंगाबाई रूग्णालयात येणार्‍यांना डुकरांचे दर्शन झाल्याशिवाय राहत नाही, सद्यस्थितीत या रूग्णालयाची हीच स्थिती आहे.

या प्रकाराकडे आरोग्य विभागाने व बाई गंगाबाई रूग्णालयाच्या जबाबदार अधिकार्‍यांनी तातडीने लक्ष देऊन डुकरांच्या आवागमनावर बंदोबस्त करण्याची गरज निर्माण झाली आहे. शिवाय रूग्णालयाचे आवार व परिसर स्वच्छ ठेवण्याची मागणी येथे भेट देणार्‍या रूग्णांच्या नातलगांनी केली आहे. (प्रतिनिधी)