शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

त्रिलोकेश्वरधामध्ये द्वादश ज्योतिर्लिंगाचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2017 01:48 IST

तालुक्यात सर्वात मोठे शिवालय तसेच द्वादश ज्योर्तिलिंग असलेले ५१ फूट उंचीचे त्रिफळाचे त्रिशूल असलेले एकमेव स्थळ त्रिलोकेश्वरधाम

सालेकसा : तालुक्यात सर्वात मोठे शिवालय तसेच द्वादश ज्योर्तिलिंग असलेले ५१ फूट उंचीचे त्रिफळाचे त्रिशूल असलेले एकमेव स्थळ त्रिलोकेश्वरधाम हलबीटोला येथे महाशिवरात्रीनिमित्त सर्वात मोठी जत्रा भरते. या जत्रेत दिवसभर भाविकांची रीघ लागते. महाशिवरात्रीनिमित्त पाच दिवसीय शिवमहापुराणावर आधारित अध्यात्मिक प्रवचनमाला असल्याने यादरम्यान लाखोंच्या संख्येने भाविक येथे येऊन जातात. यंदा ही महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची रीघ लागणार आहे. त्यासाठी आयोजन समितीने जय्यत तयारी केली आहे.४५ वर्षापूर्वी स्थापित झालेले त्रिलोकेश्वरधाम महाशिवरात्रीला विशेष आकर्षणाचे केंद्र असले तरी द्वादश ज्योतिलिंगाचे दर्शन घेण्यासाठी दूर-दूरवरुन भाविक या ठिकाणी येतात आणि आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी आराधना करतात. सालेकसा रेल्वे स्टेशनपासून २०० कि.मी. अंतरावर असलेले त्रिलोकेश्वरधाम हलबीटोला येथील पहाडावर स्थापित आहे. लगतच घनदाट जंगल, दुर्गम पर्वत, परंतु निसर्गरम्य वातावरण आणि पहाडाच्या पायथ्याशी असलेले मनोहारी जलाशय वेगवेगळ्या देवी-देवतांच्या मंदिरांचा समूह हे आकर्षणाचे केंद्र आहे. त्यातच ५१ फूट उंचीचा त्रिशूल आणि त्यात खाली द्वादश ज्योर्तिलिंगाचे भव्य शिवालय, त्या ज्योतीलिंगाची परिक्रमा करण्यात वेगळीच अनुभूती येते. याच परिसरात १५ फूट उंच भगवान शंकराची मूर्ती उंच पहाडाच्या टोकावर विराजमान आहे. बाजूला शिवजीचे वाहन नंदीची ५ फूट उंच भव्य मुर्ती बसलेल्या अवस्थेत असून शिवाप्रती आपली श्रद्धा दाखवित असल्याचा आभास करुन जाते. सालेकसा ते दरेकसा मार्गावरुन रेल्वेने किंवा बसने प्रवास करीत असताना प्रवाशांना या शिवालयाच्या त्रिशूलाचे आणि शंकरजीच्या मूर्तीचे दुरूनच दर्शन घडते. हलबीटोलाच्या पहाडावर १७ एकर परिसरात असलेल्या त्रिलोकेश्वरधाममध्ये दरवर्षी महाशिवरात्रीला ५ दिवसीय प्रवचन, सत्संग सोहळा आयोजित केला जातो. अनेक तपस्वी साधू संत व साध्वी दरवर्षी येथे सत्संग करतात.(तालुका प्रतिनिधी)