अमरावती : विदभार्तील शेतकरी आत्महत्याग्रस्त अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, वाशिम व वर्धा या सहा जिल्ह्यांतील यंत्रणांनी नरेगा अंतर्गत अपूर्ण विहिरी पूर्ण करण्यासाठी स्थानिक पातळीवर नियोजन करावे, असे निर्देश प्रधान सचिव (रोहयो) व्ही. गिरीराज यांनी दिले.विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात प्रधान सचिव व्ही. गिरीराज यांच्या अध्यक्षतेखाली नरेगा अंतर्गत अपूर्ण विहीरींचा आढावा घेण्यात आला. बैठकीला विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, उपसचिव (रोहयो) आर. विमला व अमरावती विभागातील सर्व जिल्हाधिकारी उपस्थित होते. प्रधान सचिव पुढे म्हणाले, विदभार्तील उपरोक्त सहा जिल्हयात सिंचन सुविधा वाढविण्यासाठी व शेतक?्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी धडक सिंचन व मनरेगा योजनेअंतर्गत विहीरी पूर्ण करण्याचे काम गाव पातळीवर गतिमान करण्याचे निर्देश दिले आहे. नरेगा अंतर्गत प्रत्येक तालुक्यात १३०० विहिरी पूर्ण करण्याचा लक्षांक देण्यात आला आहे. या लक्षांकातील अपूर्ण असलेल्या विहिरी पूर्ण करण्यात येणार आहेत, असे त्यांनी सांगितले.विहिरीच्या कामांचा पाठपुरावा करण्यासाठी कृषी सहायक व किंवा ग्राम सेवक यांना नोडल आॅफिसर म्हणून नियुक्त करावे. नरेगात वर्ग करण्यात आलेल्या धडक सिंचन विहिरींचे काम करण्यासाठी योग्य विश्लेषण करावे, असे ते म्हणाले.
अपूर्ण विहिरी पूर्ण करण्यासाठी कालबध्द कार्यक्रम राबवा
By admin | Updated: August 22, 2015 00:40 IST