शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

योजनांचा लाभ घेण्यास जनतेने पुढे यावे

By admin | Updated: December 23, 2016 00:52 IST

ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता विकासाच्या मुख्य प्रवाहात यावे यासाठी केंद्र व राज्य

राजू पालीवाल : १०४ लाभार्थ्यांना गॅस सिलिंडरचे वाटप अर्जुनी मोरगाव : ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता विकासाच्या मुख्य प्रवाहात यावे यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून विविध लोकोपयोगी योजना राबविल्या जातात. गाव खेड्यातील सामन्य नागरिक सुखी, संपन्न होण्यासाठी अनुदान तत्वावरील विविध योजना आहेत. गरजू लाभार्थी वंचित राहणार नाही यासाठी गावपातळीवरील लोकप्रतिनिधींनी जागरुक राहून योजनांची माहिती ग्रामस्थांना द्यावी. सामान्य जनतेचा सर्वांगिण विकास साधण्यासाठी, शासकीय योजनांचा लाभ पदरी पाडण्यासाठी गावपातळीवरील नागरिकांनी पुढे यावे, असे प्रतिपादन मोरगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच राजू पालीवाल यांनी केले. मोरगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात नवीन गॅस कनेक्शन वाटपाच्या छोटेखानी कार्यक्रमाप्रसंगी ग्रामस्थांना ते मार्गदर्शन करीत होते. प्रधानमंत्री बीपीएल गॅस कनेक्शन योजनेंतर्गत अर्जुनी मोरगाव येथील इंडेन गॅस वितरण एजंसीमार्फत घरपोच नवीन गॅस जोडणी वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी सरपंच भूमिता लोधी होत्या. याप्रसंगी उपसरपंच राजू पालीवाल, इंडेन गॅस एजन्सीचे संचालक डॉ. राजेश चांडक, व्यवस्थापक प्रदीप कांबळे, छावा संग्रामचे नेते ललीत बाळबुद्धे, ग्रा.पं. सदस्य दयाराम सोनवाने, परसराम लाडे, विश्वनाथ लोधी, राजू शहारे, सुभाष लाडे उपस्थित होते. याप्रसंगी लाभार्थ्याना मार्गदर्शन करताना राजू पालीवाल म्हणाले, महिलांना स्वयंपाक करण्यासाठी बऱ्याच समस्यांना पुढे जावे लागते. चुलीच्या धुरापासून आरोग्यावर विपरित परिणाम होतात. दारिद्र्य रेषेखाली जीवन व्यतित करणाऱ्या महिलांच्या घरामध्ये गॅसचुला पेटावा म्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उज्ज्वला बीपीएल गॅस योजना नाममात्र शुल्कामध्ये सुरू केली आहे. त्यांच्या दूरदृष्टीने सामान्य महिलांच्या घरात गॅस पोहोचल्याचे सांगून जनतेने योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन राजू पालीवाल यांंनी केले. योजनेस पात्र आहेत अशा सर्व गरजू लाभार्थ्यांना गॅस वाटप केले जाईल, असे डॉ. चांडक यांनी सांगितले. यावेळी गावातील १०४ लाभार्थ्यांना शंभर रुपये नाममात्र घेवून नवीन गॅस कनेक्शन उपस्थितांच्या हस्ते वाटप करण्यात आले. गॅस पेटविताना घ्यायची काळजी याबद्दलची संपूर्ण माहिती इंडेन गॅसचे व्यवस्थापक प्रदीप कांबळे यांनी देवून संचालन केले. गॅस वितरणासाठी ललीत मस्के, बरखा शहारे, सचिन बोरकर, शुभम शहारे यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी) गॅस शेगडीचे वाटप करताना उपसरपंच राजू पालीवाल.