शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

शहराच्या समस्येकडे लक्ष द्या

By admin | Updated: May 28, 2015 01:14 IST

शहरातील समस्या सोडविण्यासाठी सेवा संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले.

गोंदिया : शहरातील समस्या सोडविण्यासाठी सेवा संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले. निवेदनानुसार, शहर व शहराबाहेरून ये-जा करणाऱ्या महिलांसाठी बाजार परिसरात व रेल्वे स्थानक परिसरात महिला शौचालय नाही. त्यामुळे महिलांना मोठाच त्रास सहन करावा लागतो. तसेच त्यामुळे त्वरित शहरात महिला शौचालय बनविण्यात यावे.रामनगर परिसरातील मोठ्या तलावाचे खोलीकरण करण्यात यावे. या तलावाची खोली कमी असल्यामुळे थोड्याशा पावसात तलाव भरतो व रिंग रोड परिसरात पूर येतो. गजानन कॉलनी, एनएमडी कॉलेज व रिंग रोड परिसरातील लोक पूरपीडित आहेत. घाण पाणी घरात जमल्यामुळे अनेक आजारांना वाव मिळतो व दुष्परिणाम लहान बालकांवर होतो. सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी नाल्यांची स्वच्छता करण्यात यावी व गोंदिया शहर स्वच्छ व निर्मल बनविण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे आदी बाबींचा समावेश आहे. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या वतीने समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी सेवा संस्थेचे अध्यक्ष निलेश देशभ्रतार, उपाध्यक्ष मनिष तिवारी, सचिव सविता तुरकर, मकसूद खान, गुलाब ठाकूर, हरिकेश चौधरी, शैलेश ठाले, अहमद मणिहार, रिना रहांगडाले उपस्थित होते. (प्रतिनिधी)