शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांना वेतनश्रेणी मिळण्याचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क केशोरी : जिल्ह्यात कार्यरत मान्यताप्राप्त शिक्षकांना सेवेची सलग १२ वर्ष आणि २४ वर्ष पूर्ण केल्यानंतर वरिष्ठ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

केशोरी : जिल्ह्यात कार्यरत मान्यताप्राप्त शिक्षकांना सेवेची सलग १२ वर्ष आणि २४ वर्ष पूर्ण केल्यानंतर वरिष्ठ वेतनश्रेणी आणि निवडश्रेणी मंजूर करण्याची प्रक्रिया मागील पाच वर्षांपासून रखडली होती. अखेर शासनाने निर्णय घेऊन विद्या प्राधिकरणाला सेवांतर्गत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यासंबंधी सुचवले आहे. त्याकरिता जिल्ह्यातीेल शाळा मुख्याध्यापकांकडून माहिती मागविण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. त्यामुळे आता शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी, निवडश्रेणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मागील पाच वर्षांपासून जिल्ह्यातील शासनमान्य माध्यमिक, उच्च माध्यमिक, प्राथमिक शाळेत मान्यताप्राप्त कार्यरत शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी, निवडश्रेणी मंजूर करण्यासाठी पात्र असलेल्या शिक्षकांसाठी सेवांतर्गत प्रशिक्षणाची अट पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले होते. परंतु, सेवांतर्गत प्रशिक्षणाचे आजपर्यंत आयोजन करण्यात आले नव्हते, त्यामुळे जिल्ह्यातील बहुतेक शिक्षक वरिष्ठ वेतनश्रेणी, निवडश्रेणीच्या लाभापासून वंचित होते. सबंधीत शिक्षकांचे प्रस्ताव शाळा मुख्याध्यापकांकडून वरिष्ठ लेखाधिकारी शिक्षण विभाग यांचेकडे पाठविण्यात आली होती. परंतु त्यांना सेवांतर्गत प्रशिक्षणाची अट पुढे करुन या शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी, निवड श्रेणीपासून वंचित ठेवण्यात आले होते. त्यामुळे शिक्षकांना आर्थिक लाभ मिळाला नव्हता. आता शासनाने विद्या प्राधिकरणाला सेवांतर्गत प्रशिक्षणाचे आयोजन करण्याचे आदेश दिल्यामुळे सेवांतर्गत प्रशिक्षणासाठी पात्र असलेल्या शिक्षकांची माहिती शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत शाळा मुख्याध्यापकांकडून मागविण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी, निवडश्रेणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, शिक्षकांनाही आनंद झाल्याचे दिसून येत आहे. ज्या वर्षीपासून संबंधित शिक्षक वरिष्ठ वेतनश्रेणी किंवा निवड श्रेणीसाठी पात्र होते, त्यावर्षीपासून शिक्षकांना लाभ देण्यात यावा, अशी मागणी शिक्षक भारती शाखा, अर्जुनी मोरगावचे अध्यक्ष प्रा. दिनेश नाकाडे यांनी केली आहे.