शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

तंत्रशिक्षणामुळे सर्वांगिण विकासाची वाटचाल

By admin | Updated: January 2, 2017 00:47 IST

दहावी, बारावीनंतर विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या अनेक वाटा फुटतात, परंतु नेमका कोणता मार्ग निवडावा

डे यांचे प्रतिपादन : फिरता तंत्रशिक्षण मार्गदर्शन मेळावा आमगाव : दहावी, बारावीनंतर विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या अनेक वाटा फुटतात, परंतु नेमका कोणता मार्ग निवडावा याबाबत विद्यार्थ्यांच्या मनात गोंधळ निर्माण होतो. याकरिता विद्यार्थ्यांना मार्गदर्शन म्हणून तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ आणि श्री लक्ष्मणराव मानकर कॉलेज आॅफ पॉलिटेक्नीक यांच्या संयुक्तवतीने महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ नागपूर विभागाचे उपसचिव डॉ.एस.जे. पाटील व सहसचिव ए.जे. फुलझेले यांच्या मार्गदर्शनाखाली फिरता तंत्रशिक्षण मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता. तीन दिवसीय मेळाव्याचे मार्गदर्शन श्री लक्ष्मणराव मानकर इन्स्टिट्यूट आॅफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. डी.के. संघी, पॉलीटेक्नीक कॉलेजचे प्राचार्य संदीप हनुवते, बी.एड. कॉलेजचे प्रभारी प्राचार्य जे.यु. बन्सोड, डी.टी.एड. कॉलेजचे प्राचार्या ए.ए. सड्डल यांनी केले. या मेळाव्यात विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षणाचे मार्गदर्शन कालावधीत जि.प. हायस्कुल रिसामा, आदर्श विद्यालय, विद्यानिकेतन हायस्कुल, रविंद्र ज्यु. कॉलेज चोपा, पी.डी. रहांगडाले विद्यालय गोरेगाव, रामकृष्ण ज्यु. कॉलेज कुऱ्हाडी, ग्रामविकास विद्यालय तिरखेडी, सालेकसा हायस्कुल सालेकसा, जि.प. हायस्कुल कावराबांध येथे मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आले. या मेळाव्यात मार्गदर्शक म्हणून प्राचार्य सुनील निनावे, प्राचार्य डी.एम. राऊत, कमलबापू बहेकार, आर.के. डे. एच.डी. कावळे, एम.एन. कोटांगले, पी.आर. पटेल, एन.एम. सोनवाने, ओ.एस. गुप्ता, डॉ. डी.के. संघी, संदीप हनुवते, प्रभारी प्राचार्य जयंत बन्सोड, पी.बी. कटरे, के.एस. पात्रीकर, एन.जे. कथलेवार, पी.डी. कटरे, एम.आर. तिवारी, डी.एस. बोरकर यावेळी मार्गदर्शन केले. याप्रसंगी मार्गदर्शकांनी तंत्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान काय हे माहिती झाले. या अभ्यासक्रमाच्या माध्यमाने विद्यार्थ्यांसह राष्ट्रविकासाची चालना मिळाली व तंत्रशिक्षणामुळे विकासाची वाटचाल सुरू झाली असे मत व्यक्त केले. सदर मेळाव्यांतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेबाबद माहिती मिळाली. तंत्रशिक्षणामुळे विकासाची वाटचाल सुरू झाली असे मत आर.के.डे यांनी व्यक्त केले. सदर मेळाव्यांतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेबाबद माहिती, शालांत अभ्यासक्रमानंतर तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांतर्गत विविध अभ्यासक्रमााची माहिती व शैक्षणिक कर्ज, शिष्यवृत्ती बाबत मार्गदर्शन, अल्प कालावधीचे अभ्यासक्रमाबाबत विद्यार्थ्यांना व पालकांना सविस्तर माहिती देण्यात आली. सदर आयोजित फिरते तंत्रशिक्षण मार्गदर्शन मेळाव्याचे प्रास्ताविक महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे प्रतिनिधी जी.पी. पटले यांनी मांडले. संचालन करून आभार एन.जे. कथलेवार यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्रा. पंकज कटरे, नरेंद्र कावळे, यशवंत मानकर, भरत नागपुरे, मनिष मेश्राम यांनी सहकार्य केले.