शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या पळवापळवीसाठी पेटले पासवर्ड युद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 08:20 IST

Gondia News विद्यार्थ्यांच्या पळवापळवीसाठी आता शाळाशाळांत द्वंद्वयुद्ध पेटले आहे. आता काही शाळांच्या स्टुडंट पोर्टलच्या पासवर्डशी छेडछाड होत असल्याचा गंभीर प्रकार घडत असल्याच्या चर्चेला ऊत आला आहे.

संतोष बुकावन

लोकमत न्यूज नेटवर्क

गोंदिया: विद्यार्थ्यांच्या पळवापळवीसाठी आता शाळाशाळांत द्वंद्वयुद्ध पेटले आहे. आता काही शाळांच्या स्टुडंट पोर्टलच्या पासवर्डशी छेडछाड होत असल्याचा गंभीर प्रकार घडत असल्याच्या चर्चेला ऊत आला आहे. पोर्टलच्या पासवर्डशी नेमका कोण छेडछाड करतो हा संशोधनाचा विषय आहे. (Password war for students in Gondia district)

 

             तालुक्यात बोगस विद्यार्थ्यांचा  सुळसुळाट आहे. अनेक शाळांत एकच विद्यार्थी दोन शाळांत असल्याचे प्रकार आहेत. दरवर्षी ३० सप्टेंबरला विद्यार्थी पटनिर्धारण होत असते. या आधारावरच संच व शिक्षक मान्यता पदे ठरत असतात. पटसंख्या कायम राखण्यासाठी आता शाळांचा आटापिटा सुरू आहे. बोगस विद्यार्थी भरतीचा पर्दाफाश झाल्यानंतर अधिकच गंभीर प्रकार व्हायला सुरुवात झाली आहे. शासनाच्या शिक्षण विभागाने ३० सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अपडेट करण्याचे फर्मान सोडले आहे. यामुळे बोगस विद्यार्थ्यांचे बिंग फुटत आहे.

आधारकार्ड अपडेट करताना अनेक विद्यार्थी आणखी कुठल्यातरी दुसऱ्या शाळेत शिकत असल्याचे पोर्टलवर संदेश येत आहेत. एखाद्या शाळेतील विद्यार्थी दुसऱ्या शाळेत प्रविष्ठ असल्यास रिक्वेस्ट पाठवावी लागते. ही रिक्वेस्ट दुसऱ्या शाळेने कन्फर्म करायची असते. त्याशिवाय शाळा बदल झाल्याचे पोर्टलवर दिसत नाही. ज्या शाळेत बोगस विद्यार्थी आहेत त्या शाळा आता संकटात सापडल्या आहेत. त्यामुळे पासवर्डशी छेडछाड करण्याचा अदभूत प्रकार आता होऊ घातला आहे. ज्या शाळेत आपल्या शाळेतील एखादा विद्यार्थी आहे. त्या शाळेचा पासवर्ड हस्तगत करायचा. आपल्या शाळेतील पासवर्ड आपल्याला माहिती असतोच. दोन्ही शाळेचे पासवर्ड असल्याने पोर्टल उघडून आपणच रिक्वेस्ट पाठवायची व दुसरा पोर्टल उघडून रिक्वेस्ट कन्फर्म करायची असे षडयंत्र सुरू आहेत.

 

बुधवारी काही शाळांनी आपल्या शाळेचे पोर्टल उघडले तेव्हा पासवर्डशी छेडछाड झाल्याचा प्रकार लक्षात आला. दोन-तीनदा पासवर्ड रिसेट करूनही असाच प्रकार होत असल्याचे एका शिक्षकाने नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर सांगितले. परिसरातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक मिळून या गंभीर प्रकाराची गटशिक्षणाधिकारी यांचेकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

अधिकाऱ्याचे मौन

             तालुक्यात बोगस विद्यार्थ्यांचा सुळसुळाट सुरू असताना अधिकाऱ्यांचे मौन हा चर्चेचा विषय आहे. अजूनपर्यंत साधी चौकशी करण्याचे धाडस अधिकाऱ्यांनी दाखवू नये याचे आश्चर्य वाटते. अधिकारी नुसते सभा घेण्यातच खूश आहेत. विद्यार्थी पळवापळवीसाठी हे असले गंभीर प्रकार करण्यास एकप्रकारे अधिकारीच सवड देत असल्याचे दिसून येते.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र