शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

पानगाव-सोनपुरी-खेडेपार रस्त्याची दुर्दशा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:35 IST

सोनपुरी : सालेकसा तालुक्यातील पानगाव-सोनपुरी-खेडेपार रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्यामुळे अपघातांच्या संख्येत वाढ ...

सोनपुरी : सालेकसा तालुक्यातील पानगाव-सोनपुरी-खेडेपार रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्यामुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना सुद्धा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, संबंधित विभागाने अद्यापही या रस्त्याची दुरुस्ती केली नाही. परिणामी गावकऱ्यांची समस्या कायम आहे.

पावसाळ्याच्या दिवसात पानगाव-सोनपुरी-खेडेपार रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य तयार होते. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या शालेय विद्यार्थी व प्रवाशांना सुद्धा याचा त्रास सहन करावा लागतो. खड्ड्यात पाणी साचल्याने केव्हाही अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. या रस्त्यावर दोन-तीनदा अपघात होऊन काही जणांना अपंगत्व सुद्धा आले आहे. सोनपुरी हे गाव मोठे असून, येथे साप्ताहिक बाजार भरतो. शिवाय येथे पहिली ते बारावीपर्यंत शाळा आणि महाविद्यालय आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र आणि तलाठी कार्यालयासह अनेक कामानिमित्त नागरिकांची येथे सतत वर्दळ असते. याच मार्गावरून मध्यप्रदेश, छत्तीसगड राज्यांसह खेडेपार, बाह्मणी, पाथरी, सोनपुरी, नवेगाव, पानगाव, पांढरी, पाऊलदौना, रामाटोला, कहाली, निंबा, पिपरिया, बहेला, पठानटोला येथील लोक ये-जा करतात.

हा मार्ग राज्य महामार्गाला जोडणारा असून, नेहमी प्रवाशांची वर्दळ असते. या रस्त्याची दुरुस्ती मागील २०-२५ वर्षांपासून करण्यात आली नाही. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकारी व आमदारांनी याची दखल घेत रस्त्याची समस्या मार्गी लावण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.