शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

दोन बाधितांनी केली मात, सात ॲक्टिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:36 IST

गोंदिया : मागील दोन तीन दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत थोडी वाढ झाली होती. त्यामुळे जिल्हावासीयांच्या काळजीत भर पडली होती. ...

गोंदिया : मागील दोन तीन दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत थोडी वाढ झाली होती. त्यामुळे जिल्हावासीयांच्या काळजीत भर पडली होती. मात्र बुधवारी (दि.८) दोन बाधितांनी कोरोनावर मात केल्याने कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या सात वर आली. तर आठपैकी सहा तालुके कोरोनामुक्त झाले आहे. तर देवरी आणि अर्जुनी मोरगाव या दोनच तालुक्यात कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहे.

कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने बुधवारी ९८ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी ७६ नमुन्यांची आरटीपीसीआर तर २२ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात एकही नमुना कोरोनाबाधित आढळला नाही. त्यामुळे कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट शून्य होता. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत ४४८९९८ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी २२९२९२ नमुन्यांची आरटीपीसीआर तर २१९७१६ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात ४१२१० कोरोना बाधित आढळले. यापैकी ४०४९९ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत ७ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहे.

.............

८ लाख ३८ हजार नागरिकांचे लसीकरण

कोरोनाला प्रतिबंध लावण्यासाठी लसीकरण हे महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे शासन आणि प्रशासनाकडून लसीकरणावर भर दिला जात आहे. जिल्ह्यात १२५ केंद्रावरुन लसीकरण सुरु आहे. आतापर्यंत ८ लाख ३८ हजार ६७७ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

................

कोट

नागरिकांनो नियमांचे करा पालन

कोरोनाचा संसर्ग आटोक्यात असला तरी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. आपले थोडेही दुर्लक्ष पुन्हा कोरोनाला आमंत्रण देणारे ठरु शकते. शिवाय यामुळे आपल्या सण उत्सवांवरसुद्धा विरजन पडू शकते. त्यामुळे सर्वांनी नियमांचे पालन करुन काळजी घेण्याची गरज आहे.

- लक्ष्मीचंद रोचवानी, जिल्हा महासचिव व्यापारी असोसिएशन

..............

सण उत्सव सुरळीत पार पाडा

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा अंदाज वर्तविला जात आहे. अशात नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांकडे दुर्लक्ष न करता त्यांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. तसेच सण उत्सवाच्या काळात नागरिकांनी याची अधिक खबरदारी बाळगण्याची गरज आहे.

- दुलीचंद बुद्धे, सामाजिक कार्यकर्ते.

........................

स्वत:ची आणि कुटुंबीयांची घ्या काळजी

जिल्ह्यात कोरोना आटोक्यात असला तरी आपले थोडेही दुर्लक्ष पुन्हा कोरोनाला आमंत्रण देणारे ठरु शकते. त्यामुळे मास्क, सॅनिटायझरचा वापर आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे गरजेचे आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळून स्वत:ची आणि कुटुंबांची काळजी घ्या.

- डॉ. नामदेव किरसान, जिल्हाध्यक्ष काँग्रेस