शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

परदेशी पाहुण्यांनी बहरली जलाशये

By admin | Updated: January 3, 2017 00:25 IST

पोषक वातावरणाचा शोध घेत आकाशातून उडत उडत परदेशी पाहुणे पक्षी सातासमुद्रापार गोंदिया जिल्ह्यातील

अभ्यासक व पक्षीनिरीक्षकांसाठी पर्वणी : पोषक वातावरणामुळे सातासमुद्रापलीकडून जिल्ह्यात दाखल संतोष बुकावन ल्ल अर्जुनी मोरगाव पोषक वातावरणाचा शोध घेत आकाशातून उडत उडत परदेशी पाहुणे पक्षी सातासमुद्रापार गोंदिया जिल्ह्यातील जलाशयांवर दाखल झाले आहेत. यापूर्वी कधीही न बघितलेले विविध प्रजातीचे पक्षी अभ्यासक व पक्षी निरिक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत. नवेगावबांध जलाशयाकडे दिवसेंदिवस परदेशी पक्षी पाठ फिरवित असले तरी इतर जलाशयांवर त्यांचा मुक्तविहार दिसून येतो. अर्जुनी मोरगाव तालुका निसर्गसौंदर्याने बहरलेला आहे. तलावांची संख्या भरपूर आहे. नवेगावबांध, इटियाडोह, सिरेगावबांध, बोंडगाव/सुरबन (शृंगारबांध) हे मोठे तलाव आहेत. येथे दरवर्षी हिवाळ्यात नित्यनेमाने विदेशी परक्षी येतात. यासोबतच भुरसीटोला, माहुरकुडा व इतर गावच्या तलावांवर यावेळी पक्ष्यांनी हजेरी लावली आहे. विदेशी पक्ष्यांचे आगमन साधारणत: आॅक्टोबर महिन्यात होत असते. ते ज्या प्रदेशात वावरतात तेथील कडक हिवाळा, बर्फवृष्टी, खाद्यान्नाची कमतरता यामुळे ते स्थलांतर करतात. भरपूर खाद्य व पोषक वातावरणाच्या शोधात ते भारतासारख्या समशितोष्ण प्रदेशात येऊन राहतात. प्रतिकुल परिस्थितीत जगणे, प्रजननातील अडचणी हे सुद्धा स्थलांतराचे कारण मानले जाते. स्थलांतरीत पक्षी युरोप, सायबेरीया, मंगोलीया तसेच हिमालयाकडून भारतात प्रवेश करतात. सहा महिन्याच्या वास्तव्यानंतर साधारणत: फेब्रुवारी-मार्च महिन्यात ते परततात. मासेमारी व मानवी अधिवास नसलेल्या तलावांना विदेशी पक्षी पसंती दर्शवितात. अशा ठिकाणी थवेच्या थवे दिसून येत आहेत. सायबेरियन पक्ष्यांची संख्या भरपूर असल्याचे पक्षीनिरीक्षक सांगतात. भुरसीटोला येथील तलावांवर ग्रेलॅग गुज हे पक्षी मोठया संख्येत आ हेत. येथील तलावांवर लेसर विसलिंग डक, कुडस, विजन, गार्गनी, युरोप, आशिया, जपान व चिन देशात आढळणारे कॉमन टिल, युरोप, आशिया व अमेरिकेत आढळणारे पिंटेल, टपटेल पोचार्ड, लिटल ग्रेब, वुडसँड पायपर (छोटी तुतवार), युरेशियन कर्लू, लिटील स्टिंट, रिंगप्लेवर, मार्स हेरीयर, पेंटेड स्राईप, ग्रे हेरान, कोम्बच डक (नाकेर) अशा विविध प्रजातींचे पक्षी स्थानिक तलावांवर दिसून येत आहेत. काही तलावात पक्ष्यांची शिकारही होत असल्याची चर्चा आहे. शिवाय येथील तलावाच्या पाळीवर तुरपीक लागवड केली असल्याने त्याचा अभ्यासक व पक्षीप्रेमींना पक्षीवैभव न्याहाळतांना त्रास जाणवतम असल्याची ओरड आहे. या गोष्टी ठरताहेत पक्ष्यांसाठी धोकादायक नवेगावबांध, सिरेगावबांध येथील तलावांवर मासेमारी केली जाते. नवेगावबांध तलावात भिसकांदा मोठ्या प्रमाणात आहे. भिसकांदा हा पक्ष्यांचे आवडता खाद्य आहे. या खाद्याच्या आकर्षणापोटी पक्षी जलाशयावार मोठी गर्दी करायचे. याशिवाय कोळी बांधव मासेमारी करतात. याचा पक्ष्यांना त्रास होतो. मानवी अधिवासामुळे त्यांची घरटी, अंडी, नष्ट होऊन प्रजननात बाधा उत्पन्न होते. त्यामुळे अशा तलावांकडे परदेशी पाहुणे पाठ दाखवित असल्याचे पक्षीप्रेमी सांगतात. मात्र विस्तीर्ण असलेल्या या तलावांच्या काठावर गावकरी भिसकांद्याचे उत्खनन करतात. या भिसकांद्याला प्रचंड मागणी आहे. छत्तीसगड राज्याच्या बाजारपेठेत हा भिसकांदा विकला जातो. याची भाजी तयार करुन भोजनात वापरला जाते. या अवैध उत्खननामुळे भिसकांदा नष्ट होत आहे.