शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कोदामेडी ग्रामपंचायतीच्या नियमबाह्य कामांची चौकशी

By admin | Updated: December 29, 2016 01:09 IST

तालुक्यातील नियमबाह्य कामे करण्यासाठी प्रसिध्द असलेल्या कोदामेडी ग्रामपंचायतीची चौकशी करण्याचे आदेश आयुक्त कार्यालय नागपूर

आयुक्तांचे आदेश : गटविकास अधिकाऱ्यांकडे जबाबदारी सडक-अर्जुनी : तालुक्यातील नियमबाह्य कामे करण्यासाठी प्रसिध्द असलेल्या कोदामेडी ग्रामपंचायतीची चौकशी करण्याचे आदेश आयुक्त कार्यालय नागपूर यांचेकडून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना प्राप्त झाले. त्यानुसार जिल्हा परिषदेकडून चौकशीचे पत्र येताच सडक-अर्जुनी पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी आनंद लोकरे यांनी कोदामेडी ग्रा.पं.मध्ये जावून चौकशीला प्रारंभ केला आहे. प्रकरण असे की, ग्रा.पं.कोदामेडी येथे सभामंडपाचे बांधकाम डिसेंबर २०१५ ला सुरू करण्यात आले. तसेच जानेवारी २०१६ मध्ये दलित वस्ती योजनेअंतर्गत सिमेंट रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले. परंतु सदर काम सुरू करण्यापूर्वी साहित्य पुरवठ्याकरीता निविदा काढणे महत्वाचे होते. परंतु सरपंच आणि सचिवांनी निविदा न काढता नियमबाह्यरित्या आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून काम पूर्ण करून घेतले. ही कामे पूर्ण झाल्यानंतर दि.१२/०२/२०१६ रोजी सदर कामाची वर्तमानपत्रात निविदा प्रकाशित केली. ही निविदा १७/०२/२०१६ ला उघडण्यात आली व २३ फेब्रुवारी २०१६ च्या मासिक सभेत प्रवीण भिवगडे यांचे नावाची निविदा मंजूर करण्यात आली. परंतु ग्रामपंचायतने काम आधी केले आणि नंतर निविदा काढल्या. सदर नियमबाह्य कामांची चौकशी करून सरपंच अनिता बडोले यांनी आपल्या कामात कसूर केल्यामुळे त्यांना मुंबई ग्रा.पं.अधिनियम १९५८ चे कलम ३९(१) नुसार अपात्र घोषित करावे, अशी तक्रार ग्रा.पं.सदस्य निशांत राऊत, आनंदा झाडे, सुलोचना मुनिश्वर, प्रमिला मरस्कोल्हे या सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी गोंदिया यांचेकडे आपली लिखित तक्रार दिली. परंतू त्यांच्याकडून तक्रारीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे हीच तक्रार १४ जुलै २०१६ ला विभागीय आयुक्त नागपूर यांचेकडे पाठविली. विभागीय आयुक्तांनी तक्रारीची दखल घेवून मुख्य कार्यकारी अधिकारी गोंदिया यांना पत्र पाठवून ग्रा.पं.कोदामेडीतील कामांचा अहवाल मागितला. सदर पत्राची दखल घेवून १६ डिसेंबरला तक्रारकर्त्याना आणि सरपंच अनिता बडोले आणि तत्कालीन सचिव एस.एस.लांजेवार यांना ग्रा.पं.मध्ये बोलावून लोणारे यांनी चौकशी केली.