शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

घरकुलाच्या नावावर नियमबाह्य वसुली

By admin | Updated: September 4, 2015 01:48 IST

ग्रामीण क्षेत्रातील दारिद्र्य रेषेखालील बेघर किं वा कच्चे घर असलेल्या लाभार्थ्यास कायमस्वरुपी पक्के घर बांधणीसाठी अर्थ सहाय्य देऊन घरकूल ...

कित्येकांना गंडविले : गावकऱ्यांची कारवाईची मागणी रावणवाडी : ग्रामीण क्षेत्रातील दारिद्र्य रेषेखालील बेघर किं वा कच्चे घर असलेल्या लाभार्थ्यास कायमस्वरुपी पक्के घर बांधणीसाठी अर्थ सहाय्य देऊन घरकूल तयार करण्यासाठी लाभार्थ्यांची निवड ग्राम सभेत करणे आवश्यक आहे. परंतु सिरपूर येथील ग्रामपंचायत सदस्य आणि तंटामुक्त समितीच्या अध्यक्षाने संगनमत करुन गावातील भोळ््या लोकांना घरकूल मंजर करवून देण्याचे आमिष देऊन त्यांच्याकडून पैशांची वसुली केली आहे. अवैध मार्गाने करण्यात आलेल्या वसुलीच्या प्रकारामुळे गावकऱ्यांत रोष निर्माण झाला असून प्रकरणी खंडविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी गावकरी करीत आहेत. केंद्र आणि राज्य शासनाच्या इंदिरा आवास घरकूल योजनेच्या लाभार्थ्यांची निवड ही त्या-त्या ग्रामपंचायतींच्या ग्रामसभेतून केली जाते. यासाठी लाभार्थी हा दारिद्र्य रेषेखालील असणे बंधनकारक आहे. विशेष म्हणजे घरकुलासाठी करण्यात आलेली लाभार्थ्यांची निवड ही ग्रामसभेने मंज़ूर केलेल्या प्रतीक्षा यादीमध्ये असणेही आवश्यक आहे. त्याचप्रमाणे लाभार्थी बेघर अथवा त्याचे कच्चे घर गावात असणे आवश्यक आहे. तर रमाई आवास योजनेचा लाभार्थी हा अनुसूचित जातीचा असणे आवश्यक आहे. त्याला जाती प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. मात्र ग्राम सिरपूर येथील ग्रामपंचायत सदस्य आणि तंटामुक्त समितीच्या अध्यक्षांनी गावातील अशिक्षित व निराधार व्यक्तींना घरकूल मंजूर करवून देण्याचे आमिष दिले. यासाठी त्यांनी गावातील व्यक्तींकडून प्रत्येकी दोन हजार रूपयांची वसुली केल्याची ओरड गावात होत आहे. गावातील व्यक्तीच गावातीलच गरीब व निराधारांची लुबाडणूक करीत असल्याचे उघडकीस आल्याने गावकऱ्यांत रोष व्याप्त आहे. (वार्ताहर)