शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

कालबाह्य औषधांचा साठा रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 21:30 IST

किशोरवयीन मुली, स्तनदा माता, गरोदर व रक्ताचे प्रमाण कमी असलेल्या रुग्णांना पुरविण्यात येणाऱ्या लोहयुक्त गोळ्यांचा कालबाह्य झालेला साठा अर्जुनी-मोरगाव- दाभना रस्त्यावर अस्ताव्यस्त फेकण्यात आला.

ठळक मुद्देऔषधे कुठून आली? : शोध घेण्याचे आरोग्य विभागापुढे आव्हान, दोषींवर कठोर कारवाईची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : किशोरवयीन मुली, स्तनदा माता, गरोदर व रक्ताचे प्रमाण कमी असलेल्या रुग्णांना पुरविण्यात येणाऱ्या लोहयुक्त गोळ्यांचा कालबाह्य झालेला साठा अर्जुनी-मोरगाव- दाभना रस्त्यावर अस्ताव्यस्त फेकण्यात आला. ही औषधी कुणी फेकली याचा शोध घेण्याचे आरोग्य विभागासमोर मोठे आव्हान आहे.प्राप्त माहितीनुसार, गरोदर व रक्ताचे प्रमाण कमी असलेल्या रुग्णांना शासनातर्फे लोहयुक्त औषधांचा मोफत पुरवठा केला जातो. शाळांतील विद्यार्थी-विद्यार्थिनींना सुद्धा या औषधांचा पुरवठा केला जातो. मात्र पुरवठा केल्या जाणाºया औषधाचे प्रत्यक्ष वितरण केले जाते अथवा नाही याची सहनिशा यंत्रणेकडून केली जात नाही. बहुतांशी औषधांचे वितरणच होत नसल्याने या प्रकारावरुन उघड झाले आहे. या प्रकारामुळे आरोग्य विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे.सिंगलटोलीच्या पुढे असलेल्या टी पार्इंटपासून अवघ्या २०० मिटर अंतरावर सागवन रोपवाटिकेनजीक या कालबाह्य झालेला गोळ्यांचा मोठा खच पडून आहे. या औषधांचा वेष्टनावर महाराष्ट्र शासनाच्या वापरासाठी तसेच विक्रीकरिता नाही असे लिहिले आहे. हिंदूस्तान लेबॉरटरीज या कंपनीने पुरवठा केलेली आयरण अ‍ॅड फोलीक अ‍ॅसिड नामक या लोहयुक्त गोळ्या आहेत. या औषधांची निर्मिती मार्च २०१६ मधील असून त्या फेबु्रवारी २०१८ मध्ये कालबाह्य झालेल्या आहेत. या औषधाच्या वेष्टनावर बॅच नं. टीएएफ ६००४ एएल असे नमूद आहे. नेमका हा साठा कुणी आणून फेकला हे अज्ञात आहे. शासनातर्फे गोरगरीब व गरजू रुग्णांचे आरोग्य सुदृढ करण्यासाठी प्रयत्न केले जातात मात्र आरोग्य यंत्रणेकडून त्याचे योग्यप्रकारे नियोजन केले जात नाही. दिलेल्या उद्दीष्टाप्रमाणे त्याचे वाटपच केले जात नाही. कालांतराने ही औषधे कालबाह्य ठरतात व ती निरुपयोगी ठरतात. अशा प्रकारामुळे शासनाच्या पैशाचा अपव्यय होतो. या प्रकरणाची योग्य ती चौकशी करुन औषधे नेमकी कुणी फेकली याचा शोध घेऊन संबंधितावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.औषधे शाळेची असल्याची शक्यताकालबाह्य झालेले औषधे पुरण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयात शोषखड्डे आहेत. त्यामुळे ही औषधी शासकीय रुग्णालयातील असल्याची शक्यता कमी आहे. लोहयुक्त औषधांचा शाळांनाही पुरवठा केला जातो. त्यामुळे ही औषधे शाळांतील असल्याचीच दाट शक्यता आहे. घटनास्थळावर वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी पाठवून चौकशी करण्यात येईल अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विजय राऊत यांनी लोकमतशी बोलताना दिली.

टॅग्स :medicineऔषधं