शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
4
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
5
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
6
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
7
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
8
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
9
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
10
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
11
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
12
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
13
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
14
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
15
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
16
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
17
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
18
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
19
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
20
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
Daily Top 2Weekly Top 5

कारागृहात बंदीजनांच्या परिश्रमातून फुलतेय सेंद्रिय शेती

By admin | Updated: November 14, 2016 00:19 IST

येथील मध्यवर्ती कारागृृहातील बंदीजनांच्या परिश्रमातून सेंद्रिय शेती फुलत आहे.

आॅनलाईन खरेदीमुळे दलालांची कोंडी: प्रत्येक सातबाराची होणार तपासणीसालेकसा : यंदापासून शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावरील धान खरेदी आॅनलाईन करण्यात आलेली असून आता सातबाऱ्यावर खरी नोंद असल्याप्रमाणेच धान खरेदी केली जाईल. केंद्रावर धान विक्री करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याच्या सातबाऱ्याची प्रथम नोंदणी केली जाईल व त्यानंतर त्या सातबाऱ्याची शासकीय रेकार्डप्रमाणे महसूल विभागात नोंद असलेल्या जमिनीच्या सातबाऱ्याची पडताळणी केली जाईल. त्यामुळे सातबारा खोडतोड करणारे किंवा खोटा सातबारा बनवून वाटेल तेव्हा विक्री करणारे दलाल जाळ्यात सापडल्याशिवाय राहणार नाही. आदिवासी सेवा सहकारी संस्था अंतर्गत शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर आदिवासी शेतकऱ्यांचे निर्धारित भावात धान खरेदीसाठी सोय केली जाते. परंतु शासनाची दिशाभूल करीत काही व्यापारी व दलाल शेतकऱ्यांचे धान पडक्या भावात खरेदी करुन व त्यांचे सातबारा मागून त्यांचेच धान आधारभूत खरेदी केंद्रावर विक्री करण्याचे काम करीत राहिले. तसेच या दलालांकडे धानाचा सात बाऱ्यावर आणखी सातबाऱ्यांची गरज पडल्यास खोटे सातबारा उतारा तयार केले. किंवा खऱ्या सातबाऱ्याची खोडतोड करुन त्यात जमिनीचे प्रमाण वाढविण्याचा गोरखधंदा व्यापारी वर्गाने चालविला आहे. परंतु आता खोटा सातबारा मुळीच चालणार नसून याचा थेट फायदा शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता वाढली आहे. मात्र धान खरेदी केंद्रांनी सुद्धा शेतकऱ्यांच्या हिताची जपणूक करुन सातबाराधारक शेतकऱ्यांचे धान खरेदी करुन त्यांच्या शेतमालाला योग्य भाव देण्याचे काम केले पाहिजे. (तालुका प्रतिनिधी)एकदाच करावी लागणार सातबाराची नोंदधान विक्री झालेल्या शेतकऱ्याच्या सातबाऱ्याची नोंद एकदाच करावी लागणार असून प्रति हेक्टर ३० क्विंटल धानाची विक्री सदर शेतकरी करु शकतो. समजा त्याने पहिल्या वेळी कमी धान विक्री केली आणि पुन्हा धान विक्री करायला आल्यास विक्री मर्यादा अनुसार त्याला पुन्हा सातबारा आणून नोंदणी करण्याची गरज नाही. जर त्याने ३० क्विंटलपेक्षा जास्त धान विक्री साठी आणले व सातबाऱ्याची मर्यादा संपली तर त्याला गरज पडल्यास दुसऱ्या जमिनीच्या सातबारा उतारा आणून नोंदणी करावी लागेल. तसेच महत्वाचे आणि फायद्याचे म्हणजे यंदा ज्या शेतकऱ्यांनी सातबारा नोंदणी केली त्याला पुढच्यावर्षी त्या सातबाऱ्याची नोंदणी करण्याची गरज राहणार नाही. नोंदणी झालेल्या सातबाऱ्याच्या मर्यादेनुसार ते आपला शेतमाल खरेदी केंद्रावर आणून विक्री करु शकतील. विपणन विभागाने धान खरेदी व सातबारा नोंदणीबद्दल एक मोबाईल अ‍ॅप तयार केला असून त्या अ‍ॅपनुसार मागील सर्व माहिती पुन्हा बघता येणार तसेच संबंधित शेतकऱ्याच्या नावे नोंद असलेली शेतजमीन किती याची सगळी माहिती प्राप्त होणार आहे.