शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

४८१ बियाण्यांच्या बॅग विक्री बंदचा आदेश

By admin | Updated: June 27, 2017 01:00 IST

खरीप हंगामात शेतकऱ्यांची लूट होऊ नये यासाठी सुरू असलेल्या कृषी केंद्रांच्या तपासणी मोहिमेत दोन दिवसात १९ कृषी केंद्रांची तपासणी करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : खरीप हंगामात शेतकऱ्यांची लूट होऊ नये यासाठी सुरू असलेल्या कृषी केंद्रांच्या तपासणी मोहिमेत दोन दिवसात १९ कृषी केंद्रांची तपासणी करण्यात आली. त्यात ४८१ बियाण्यांच्या बॅग विक्रीबंदचा आदेश देण्यात आला.कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय दक्षता पथकाने ही कारवाई केली. त्यात गोंदिया, मोरगाव अर्जुनी, सालेकसा, आमगाव, तिरोडा, देवरी या तालुक्यातील १९ कृषी केंद्रांची तपासणी केली. त्यात न्युजीविडू, पायस सीड्स, चैतन्य सीड्स, कृषीधन, महागुजरात, रायझिंग, यशोदा, सिपना सीड्स या कंपन्यांच्या बियाण्यांची तपासणी केली. बियाण्यांचे उगमस्त्रोत, साठा पुस्तक, बिल बुक, बिलावर शेतकऱ्यांची सही नसणे, दरपत्रक न लावणे, प्रिन्सीपल सर्टीफिकेट नसणे, विक्री परवान्यात समाविष्ठ नसणे व इतर बाबी अनियमित असल्याचे आढळल्याने बियाणे विक्रीबंदचा आदेश देण्यात आला.संबंधित कृषी केंद्र संचालकांना दि.२८ व ३० ला रेकॉर्ड घेऊन बोलविण्यात आले. या वेळेत ते आले नाही तर विक्री परवान्याच्या निलंबनाचा आदेश देऊन बियाण्यांचा साठा जप्त केला जाणार आहे. ही कारवाई जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे, मोहीम अधिकारी शुक्ला, गुणनियंत्रण अधिकारी मोहाडीकर आदींनी केली.सध्या खरीप हंगामासाठी जिल्हाभरात महाबीजचे १७ हजार क्विंटल तर खासगी कंपन्यांचे २७ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध झाले. त्यापैकी ८० टक्के बियाण्यांचे विक्री झाली आहे. या बंदीनंतर काय कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे.