शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

कृषी पंप थकबाकीदारांना संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 21:22 IST

महावितरणच्या गोंदिया परिमंडळातील कृषी पंप ग्राहकांकडील वाढती थकबाकी लक्षात घेता थकबाकीस आळा घालण्याकरिता जे कृषी पंपधारक चालू बिल भरणार नाहीत ....

ठळक मुद्दे‘मुख्यमंत्री कृषी संजीवनी’ योजना : पाच हप्त्यात बिल भरण्याची सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महावितरणच्या गोंदिया परिमंडळातील कृषी पंप ग्राहकांकडील वाढती थकबाकी लक्षात घेता थकबाकीस आळा घालण्याकरिता जे कृषी पंपधारक चालू बिल भरणार नाहीत अशा कृषी पंप वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू झाली आहे. या थकबाकीदार शेतकºयांना दिलासा देण्यासाठी ‘मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना २०१७’ जाहीर करण्यात आली असून यात पाच हप्त्यात बिल भरण्याची सुविधा देण्यात आली आहे.गोंदिया परिमंडळाअंतर्गत असलेल्या कृषी पंप वीज ग्राहकांची थकबाकी दिवसेंदिवस वाढतच असल्याने महावितरणला मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. त्यादृष्टीनेच आता कृषी पंप ग्राहकांच्या वीज बिल थकबाकी वसुलीकडे महावितरणने गांभीर्याने लक्ष दिले असून, चालू बिल कृषी पंपधारकांनी न भरल्यास त्यांचा वीजपुरवठा त्वरित खंडित करण्याचा निर्णय महावितरण प्रशासनाने घेतला आहे.यासाठी गोंदिया व भंडारा जिल्हयामध्ये कृषी पंपधारकांची वीज बिल वसुली मोहीम राबविली जाणार आहे.परिमंडळामध्ये एकुण ६३ हजार ९१४ कृषी पंप वीज ग्राहकांकडे जून २०१७ अखेर ११० कोटी ४९ लाख रूपयांची थकबाकी आहे. यामध्ये भंडारा जिल्ह्यातील ३७ हजार ६९८ ग्राहकांकडे ६८ कोटी ४२ लाख ३० हजार व गोंदिया जिल्ह्यातील २६ हजार २१६ ग्राहकांकडे ४२ कोटी ०७ लाख ०१ हजार रूपयांची थकबाकी आहे. यामध्ये कृषी पंप जोडणी घेतल्यापासुन ११ हजार ९६१ ग्राहकांनी एकदाही वीज बिल भरलेले नाही त्यांच्याकडे १४ कोटी ४१ लाख ७४ हजार एवढी थकबाकी आहे.महाराष्ट्रातील वीज बिलांची थकबाकी असलेल्या कृषी पंपधारक शेतकºयांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र शासनाची ‘मुख्यमंत्री कृषी पंपधारक संजीवनी योजना २०१७’ जाहीर झाली असून, या योजनेमुळे वीज बिलांची थकबाकी असलेल्या शेतकºयांना दंड आणि व्याज बाजूला ठेवून मुळ थकबाकीच्या पाच समान हप्त्यात थकबाकी भरण्याची संधी शासनातर्फे उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.वीज बिलातून मिळणार संपूर्ण माहितीया योजनेत लाभार्थी शेतकºयांना महावितरणकडून १ नोव्हेंबरपासून संपूर्ण मािहतीयुक्त वीज बिल देण्यात येत असून त्यात थकबाकीची रक्कम किती व ती किती हफ्त्यात भरावयाची याची माहिती देण्यात आलेली आहे. योजनेत लाभार्थी शेतकºयांच्या बिलात महावितरणच्या बोधचिन्हाशेजारी ‘मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना-२०१७’ असे ठळक अक्षरात नमूद केले आहे. या बिलात खालील बाजूस ग्राहक क्रमांक, ग्राहकाचे नाव, चक्र ी क्र मांक नमूद केलेला आहे. बिलाच्या डाव्या बाजूस १५ नोव्हेंबर २०१७ पूर्वी शेतक ºयांनी किती रक्कम भरायची आहे याची माहिती दिली आहे. तसेच डिसेंबर २०१७ ते डिसेंबर २०१८ पर्यंत ५ हफ्त्यात किती रक्कम भरावी लागणार आहे याची सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. या बिलात महावितरणकडून ३० हजार रुपयांच्या आत थकबाकी असणाºया ग्राहकांना ५ सुलभ हफ्ते तर ३० हजार रूपयांपेक्षा जास्त असणाºया शेतकºयांना १० सुलभ हफ्ते मिळणार आहेत. याची सविस्तर माहितीही बिलात देण्यात आलेली आहे. तसेच, मुख्यमंत्री कृषी संजीवनी थकबाकीचें हफ्ते नियमित भरणाºया शेतकºयांना नेमका किती रु पयाचा दंड आणि व्याज माफ करण्याबाबत शासनाकडून विचार करण्यात येईल याचाही आकडा नमूद करण्यात आलेला आहे.