शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाइन सातबारा न झालेल्या ७ गावांतील धान खरेदीचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:20 IST

गोंदिया : सातबारा ऑनलाइन न झाल्याने धान खरेदीपासून वंचित असलेल्या ७ गावांतील शेतकऱ्यांची ही समस्या आमदार विनोद अग्रवाल यांच्या ...

गोंदिया : सातबारा ऑनलाइन न झाल्याने धान खरेदीपासून वंचित असलेल्या ७ गावांतील शेतकऱ्यांची ही समस्या आमदार विनोद अग्रवाल यांच्या मध्यस्थीने अखेर सुटली आहे. याबाबत शासन आदेश निर्गमित झाले असून, या गावांतील धान खरेदीचा प्रश्न सुटला आहे.

गोंदिया लगतच्या ७ गावांमधील शेतकरी बांधवांचा सातबारा ऑनलाइन न झाल्यामुळे शेतकरी बांधवांना रबी धानाची विक्री कुठे करायची, असा प्रश्न उद्भवला होता. यासंदर्भात शेतकरी बांधवांनी आमदार अग्रवाल यांची भेट घेऊन धान विक्रीचा तिढा सोडवण्याची विनंती केली होती. शासन निर्णयाप्रमाणे ज्या शेतकऱ्यांचा सातबारा ऑनलाइन पोर्टलवर नोंदवल्या गेला नव्हता त्यांचे धान खरेदी करण्यात येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले होते. आ. अग्रवाल यांनी गोंदिया ते मुंबई पाठपुरावा केला. अन्न व नागरी पुरवठा विभाग सचिव विलास पाटील व सहसचिवांची भेट घेत त्यांना ७ गावांमधील सातबारा ऑनलाइन न झालेल्या शेतकऱ्यांचे धान खरेदी करण्याबाबत विनंती केली होती. त्याअनुषंगाने शासन निर्णय निर्गमित करण्यात आले असून, ऑनलाइन सातबारा न झालेल्या ७ गावांचा धान खरेदीचा मार्ग मोकळा झाला आहे.

-------------------

यापुढे समस्या निर्माण होणार नाही

मागील खरीप हंगामात देखील ७ गावांमधील शेतकऱ्यांच्या धान खरेदीचा प्रश्न उद्भवला होता. यंदाच्या रबी हंगामातही तोच प्रश्न परत आल्याने आमदार अग्रवाल यांनी विषयाच्या तळात जाऊन असे परत परत घडू नये म्हणून सगळे सातबारे ऑनलाइन करवून घेतले आहेत. ज्यामुळे ७ गावांमधील धान खरेदीची समस्या यापुढे उद्भवणार नाही, असा विश्वास आमदार अग्रवाल यांनी व्यक्त केला आहे.