शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

दुरूस्तीच्या नावावर फक्त खड्डे खोदकाम

By admin | Updated: September 6, 2014 23:56 IST

आमगाववासीयांसाठी वरदान ठरलेली येथील वाढीव पाणी पुरवठा योजना राजकीय खेळीमुळे मात्र आता शाप वाटू लागली आहे. घाईघाईने झालेल्या लोकार्पणानंतर लगेच पाईप लाईन फुटून पाण्याचा नासाडा यातून होत आहे.

आमगाव : आमगाववासीयांसाठी वरदान ठरलेली येथील वाढीव पाणी पुरवठा योजना राजकीय खेळीमुळे मात्र आता शाप वाटू लागली आहे. घाईघाईने झालेल्या लोकार्पणानंतर लगेच पाईप लाईन फुटून पाण्याचा नासाडा यातून होत आहे. यावर आळा घालण्यासाठी दुरूस्तीच्या नावावर आता मात्र जागोजागी खड्डे खोदकाम काम सुरू असल्याचा प्रकार दिसून येत आहे. आज शहराची लोकसंख्या २० हजार च्या घरात आहे. वाढत्या लोकसंख्येला लक्षात घेता शासनाने दोन कोटींची वाढीव पाणी पुरवठा योजना दिली. मात्र या योजनेला दुसऱ्या योजनेत समाविष्ट करण्याचा नाद अंगलट आल्याचा प्रकार घडला. योजनेची पाईप लाईन टाकण्याचे काम सुरूच असतानाच घाईघाईत या योजनेचे लोकार्पण करण्यात आले. शहरासाठी वरदान म्हणून या योजनेकडे बघितले जात होते. मात्र श्रेय लाटण्याचे राजकारण या योजनेसाठी शाप ठरू लागले आहे. नियोजन शून्य कारभारामुळेच एक ना एक विघ्न या योजनेच्या आडी येत आहे. काम अपूर्ण असूनही त्यातून पाणी पुरवठा सुरू केल्याने पाईप लाईन फुटून पाण्याचा नासाडा होऊ लागला आहे. पाणी वाचवाचा संदेश दिला जात असताना शहरात मात्र पाण्याचा खुलेआम अपव्यय होत आहे. दुरूस्ती करण्याचे काम हाती घेण्यात आले असून फक्त खड्डे खुदाईचा प्रकार सुरू असल्याचे बघावयास मिळत आहे. हा प्रकार मात्र आता शहरवासीयांत चिड निर्माण करीत आहे. खोदण्यात येत असलेल्या खड्यांमुळे नागरिकांना एकतर वाहतूकीला त्रास होत आहे. शिवाय पाणी पुरवठा खंडीत झाल्याने नागरिकांचा पारा चढला आहे. त्यात आता पाईप लाईनच्या दुरूस्तीचे सोंग केले जात असल्याने नागरिकांच्या सहनशक्तीचा अंत होऊन ज्वालामुखी कधी फुटतो हेच बघायचे आहे. (शहर प्रतिनिधी)