शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

केवळ ८१ शेतकरी सावकारी जाचातून मुक्त

By admin | Updated: September 12, 2015 01:37 IST

शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून घेतलेल्या कर्जास माफी देणाऱ्या राज्य शासनाच्या योजनेंतर्गत

६.७० लाखांची कर्जमाफी : जिल्हास्तरीय समितीच्या सभेत तिरोडा तालुक्याची यादी मंजूरगोंदिया : शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून घेतलेल्या कर्जास माफी देणाऱ्या राज्य शासनाच्या योजनेंतर्गत तिरोडा तालुक्यातील ८१ शेतकऱ्यांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहे. जिल्हास्तरीय समितीच्या सभेत या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असून या शेतकऱ्यांचे सहा लाख ७० हजार ३६६ रूपयांचे कर्ज माफ होणार आहे. मात्र जिल्हाभरात हजारो शेतकरी सावकारी कर्जाच्या जाचात अडकले असताना मोजक्याच शेतकऱ्यांची यातून मुक्तता झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.नैसर्गिक संकटाने कंबरडे मोडून बसलेल्या शेतकऱ्यांना नाईलाजास्तव सावकारांकडून कर्ज घेऊन शेती करावी लागते. अशात सावकार या शेतकऱ्यांकडे असेल-नसेल ते सुद्धा घेऊन घेतात. परिणामी कर्जबाजारी शेतकरी आत्महत्येचा मार्ग पत्करतात. विशेष म्हणजे शेतकरी आत्महत्येचे प्रमाण याच कारणांमुळे दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. जगाचा पोशिंदाच गळफास लावून आपला जीव देत असल्याचा हा गंभीर प्रकार जिल्ह्यात सुद्धा वाढत चालला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना सावकारी कर्जाच्या पाशातून मोकळे करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला.राज्य शासनाने १० एप्रिल रोजी परवानाधारक सावकारांकडून शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाला माफी देण्यासाठी कर्जमाफीची योजना मंजूर केली. त्यानुसार जिल्ह्यातील परवानाधारक सावकारांकडून त्यांनी कर्ज दिलेल्या शेतकऱ्यांचे प्रस्ताव मागविण्यात आले. यात हजारावर प्रस्ताव तालुकास्तरावर प्राप्त झालेत, तर तालुकास्तरावर सावकारांनी सादर केलेल्या या प्रस्तावांची छाननी करून जिल्हा उपनिबंधकांकडे तिरोडा तालुक्यातील ८१ प्रस्ताव देण्यात आले. दरम्यान ५ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेत आयोजित जिल्हास्तरीय समितीच्या सभेत तिरोडा तालुक्यातील या ८१ प्रस्तावांना मंजूरी देण्यात आली. त्यात शेतक ऱ्यांचे सहा लाख ७० हजार ३६६ रूपयांचे कर्ज माफ होणार आहे. यासाठी संबंधित परवानाधारक सावकाराला कर्जदाराकडून घेतलेल्या तारण वस्तू परत कराव्या लागतील. नंतर जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत सावकाराच्या खात्यावर रक्कम जमा होणार व त्यानंतरच संबंधित कर्जदार शेतकऱ्यांस कर्जमुक्त झाल्याबाबतचे प्रमाणपत्र बहाल करण्यात येणार आहे. या सभेला पोलीस अधीक्षक शशीकुमार मिना, समितीचे सदस्य सचिव जिल्हा उपनिबंधक दिग्वीजय आहेर, जिल्हा विशेष लेखापरीक्षक सुपे, सहायक निबंधक ए.बी.गोस्वामी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)कर्जमाफीचे प्रस्ताव सादर करातिरोडा तालुक्याप्रमाणेच अन्य तालुक्यातील प्रस्तावांची तालुकास्तरीय समितीकडून छाननी झाल्यानंतर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे पाठविले जाणार आहे. जिल्हा उपनिबंधकांकडील प्रस्तावांना जिल्हास्तरीय समितीत मांडले जाणार असून त्यांची छाननी करून मंजुरी दिली जाईल. त्यामुळे ज्या कर्जदार शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे प्रस्ताव अद्यापही सावकारांनी सहायक निबंधक कार्यालयाकडे सादर केले नाही त्यांनी त्वरित प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांनी केले आहे.