शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

फक्त ३८.८६ टक्केच मतदान

By admin | Updated: May 30, 2016 01:34 IST

अवघ्या शहराचे लक्ष लागून असलेल्या शहरातील प्रभाग क्रमांक १ मधील पोटनिवडणुकीप्रती मतदारांत निरू त्साह दिसून आला.

गोंदिया : अवघ्या शहराचे लक्ष लागून असलेल्या शहरातील प्रभाग क्रमांक १ मधील पोटनिवडणुकीप्रती मतदारांत निरू त्साह दिसून आला. परिणामी या पोटनिवडणुकीत फक्त ३८.८६ टक्केच मतदान करण्यात आले. उन्हामुळे दिवसा मतदानासाठी मतदार बाहेर निघाले नसल्याचे दिसले. तर सायंकाळी मात्र मतदानात भर पडल्याचेही दिसून आले व त्यामुळेच १२ टक्के मतदानाची नोंद घेण्यात आली. रिंगणात असलेल्या सहा उमेदवारांचे भाग्य अखेर पेटीत बंद झाले. शहरातील प्रभाग क्रमांक १ मधील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक अनिल पांडे यांच्या मृत्यूमुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोटनिवडणूक घेण्यात आली. यांतर्गत रविवारी (दि.२९) मतदान घेण्यात आले. यासाठी प्रभागातील संत तुकाराम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात १ ते ४, जेठाभाई माणिकलाल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मुख्य शाखेत ५ ते ८, सरस्वती महिला विद्यालयात ९ व १० आणि नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयात ११ ते १३ असे एकूण १३ मतदान केंद्र ठेवण्यात आले होते. या पोटनिवडणुकीत एकूण १३ हजार १६७ मतदारांना मतदानाचा हक्क बजावयाचा होता. तर रिक्त झालेली ही जागा आपल्याकडे खेचून आणण्यासाठी रिंगणात असलेल्या प्रभागात राष्ट्रीय पक्षांपासून ते अपक्ष उमेदवारांनीही चांगलाच जोर लावला होता. त्यामुळे अवघ्या शहराचे लक्ष या पोटनिवडणुकीकडे लागून आहे. तर मदतानाला घेऊनही शहरवासीयांना उत्सुकता होती. मात्र फक्त ३८.८६ टक्केच मतदानाची नोंद घेण्यात आली आहे. यावरून मतदारांचा निरूत्साह दिसून आला असे म्हणणे वावगे ठरणार नाही. शिवाय कडक उन्हामुळेही मतदारांनी घराबाहेर निघणे टाळल्याचे कमी झालेल्या मतदानासाठी म्हणता येईल. विशेष म्हणजे झालेल्या मतदानांतर्गत सायंकाळी ३.३० ते ५.३० च्या राऊंडमध्ये १२ टक्के मतदानाची नोंद घेण्यात आली आहे. पोटनिवडणुकीतील या मतदानातंर्गत प्रत्येक केंद्रावर पोलिसांचा चोख बंदोबस्त दिसून आला. विशेष म्हणजे पोलीस विभागाचे अधिकारीही सातत्याने केंद्रांवर नजर ठेवून असल्याचेही दिसले. त्यामुळे शांततेत मतदान पार पडले. शिवाय अन्य काही तांत्रीक अडचणीही आल्या नसल्याची माहिती आहे. (शहर प्रतिनिधी)अशी आहे मतदानाची टक्केवारी मतदानांतर्गत संत तुकाराम महाविद्यालयात असलेल्या मतदान केंद्र क्रमांक १ वर ४०.४० टक्के, केंद्र क्रमांक २ वर ४४.५२ टक्के, केंद्र क्रमांक ३ वर ३७.२२ टक्के, केंद्र क्रमांक ४ वर ३८.५२ टक्के, जेठाभाई माणिकलाल हायस्कूलमधील केंद्र क्रमांक ५ वर ४०.४१ टक्के, केंद्र ६ वर ३९.८९ टक्के, केंद्र क्रमांक ७ वर ४०.३५ टक्के, केंद्र क्रमांक ८ वर ३४.६२ टक्के, सरस्वती विद्यालयातील केंद्र क्रमांक ९ वर ४३.२७ टक्के, केंद्र क्रमांक १० वर ३८.०१ टक्के तर नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयातील केंद्र क्रमांक ११ वर ४६.३८ टक्के, केंद्र क्रमांक १२ वर २७.९२ टक्के व केंद्र क्रमांक १३ वर ३५. ४६ टक्के मतदान झाले. नमाद महाविद्यालयात सर्वाधिक मतदान १३ केंद्रांवर घेण्यात आलेल्या मतदानातंर्गत नमाद महाविद्यालयात देण्यात आलेल्या मतदान केंद्र क्रमांक ११ वर सर्वाधीक ४६.७८ टक्के मतदानाची नोंद घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे याच महाविद्यालयातील मतदान केंद्र क्रमांक १२ वरच सर्वात कमी २७.९२ टक्के मतदानाची नोंद घेण्यात आली आहे. मतमोजणीकडे लागले लक्ष पोटनिवडणुकीची मतमोजणी सोमवारी (दि.३०) सकाळी १० वाजतापासून हिंदी टाऊन स्कूल परिसरातील स्वर्ण जयंती इमारतीत घेण्यात येणार आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला आपली जागा कायम ठेवता येते की नाही. शिवाय कुणाच्या गळ्यात विजयाची माळ पडते हे जाणून घेण्याची उत्सुकता वाढली असून सर्वांचे लक्ष आता मतमोजणीकडे लागले आहे.