शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

दहावीतही मुलींनीच मारली बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2016 07:40 IST

राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या यावर्षीच्या दहावी परीक्षेत गोंदिया जिल्ह्याने ८८.२३ टक्के निकाल देऊन

गोंदिया : राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या यावर्षीच्या दहावी परीक्षेत गोंदिया जिल्ह्याने ८८.२३ टक्के निकाल देऊन नागपूर विभागात अव्वल स्थान पटकावले. विवेक मंदिर स्कूलच्या चंचल अजय अग्रवाल हिने ९७.२० टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला. सोबतच अर्जुनी मोरगावच्या जेएमबी हायस्कूलची सावी उल्हास धाडेगोणे हिने ९७.०० तर सौंदड येथील लोहिया हायस्कूलच्या पारितोष राखडे याने ९६.८० टक्के गुण घेऊन तृतीय स्थान पटकावले आहे. तिघांच्याही गुणांमध्ये केवळ एक-एक गुणांचा फरक आहे.जिल्ह्यातून यावर्षी २३ हजार ६१३ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी २३ हजार ५६३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातून २० हजार ७९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विशेष म्हणजे उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये ४०७१ प्रावीण्य श्रेणीत, ९३०३ प्रथम श्रेणीत तर ६४८५ द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या जास्त आहे. ९०.३८ टक्के मुलींनी बाजी मारली तर मुले ८६.१८ टक्के उत्तीर्ण झाली आहेत. जिल्ह्यात चौथ्या क्रमांकावर दोन मुलींनी स्थान पटकावले आहे. त्यात विवेक मंदीर शाळेच्या वैशाली गिरी (९६.६० टक्के) व प्रोग्रेसिव्ह स्कूलच्या वैशाली बालपांडे (९६.६०) यांचा समावेश आहे. सर्वात चांगला निकाल देवरी व सडक अर्जुनी तालुक्यांनी दिला आहे. या तालुक्यातील ९० टक्केपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण झालेत.गोंदिया जिल्ह्यातील ३०५ शाळांपैकी ३० शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. त्यात बहुतांश शाळा गोंदिया शहरातील आहेत. याशिवाय दोन अनुसूचि जाती मुले व मुलींच्या निवासी शाळा आणि दोन आश्रमशाळांचाही समावेश आहे. जिल्ह्यात सर्वाधिक गोंदिया तालुक्यातून ९० शाळांचे विद्यार्थी परीक्षेला बसले होते. तर सर्वात कमी सालेकसा तालुक्यातील विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. सर्वच तालुक्यांमध्ये मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण जास्त आहे. (जिल्हा प्रतिनिधी)