आदिवासी जंगल दुर्गम भागात मोडत असून या भागात गरीब विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त आहे. या भागात कोणत्याही यंत्रणेची इंटरनेट सेवा योग्य नसल्यामुळे स्मार्टफोन विद्यार्थ्यांजवळ उपलब्ध नाहीत. फक्त १० टक्के विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण प्रणालीमध्ये सहभागी दिसून येत आहेत. बाकी ९० टक्के विद्यार्थी पूर्णत: ऑनलाइन शिक्षण प्रणालीपासून अजूनही वंचित आहेत. परत कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन राज्याच्या शिक्षणमंत्री यांनी शाळा, महाविद्यालय, इयत्ता दहावी व इयत्ता बारावीचे वर्ग सोडून पुढील आदेशापर्यंत बंदची घोषणा केली आहे. त्यामध्ये ऑनलाइन शिक्षण प्रणालीच्या माध्यमातून शिक्षण सुरू ठेवण्याचे आदेशित केले आहे. या ऑनलाइन शिक्षण प्रणालीमध्ये मात्र विद्यार्थ्यांचे हस्ताक्षराकडे दुर्लक्ष झाले आहे. याची चिंता विद्यार्थ्यांसह पालकांना सतावत आहे. प्रश्न, उत्तरे, गृहपाठ प्रत्यक्ष लिहिण्याची विद्यार्थ्यांची सवय नाहीशी झाली आहे. हस्ताक्षर चांगले येण्यासाठी विद्यार्थ्यांच्या लेखी परीक्षा होणे गरजेचेे असते, त्याशिवाय हस्ताक्षराचा सराव होणे शक्य नाही. ऑनलाइन शिक्षण प्रणालीमुळे विद्यार्थ्यांचा हस्ताक्षरांचा सराव होणे शक्य नाही. ऑनलाइन शिक्षण प्रणालीमुळे विद्यार्थ्यांची हस्ताक्षरांची गती थांबली हे म्हणणे वावगे होणार नाही.
ऑनलाइन शिक्षण प्रणालीमुळे विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षराची गती मंदावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:29 IST