शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

सर्वसामान्यांना रडवतोय कांदा

By admin | Updated: August 22, 2015 00:21 IST

बाजारात हिरवी मिरची आणि लाल मिरचीचे दर तेजीत आहेत. हिरवी मिरची ४० रुपये किलो तर लाल मिरची ११० रुपये किलो आहे. मिरची तिखट १६० रुपये किलो आहे.

४० ते ५० रुपये किलो कांदा : अवकाळी पावसाचा फटकाबाजारात हिरवी मिरची आणि लाल मिरचीचे दर तेजीत आहेत. हिरवी मिरची ४० रुपये किलो तर लाल मिरची ११० रुपये किलो आहे. मिरची तिखट १६० रुपये किलो आहे. याउलट स्थिती साखरेची आहे. साखरेचे दर ३२ रूपयावरून घसरून २५ रूपयापर्र्यंत घसरले आहेत. यामुळे साखरेचा गोडवा आणखी वाढणार असल्याचे दिसून येत आहे. डाळी कडाडल्या..४कडधान्य बाजार सर्वाधिक तेजीत आहे. यामध्ये पावसाळ्यात सर्वाधिक खरेदी होणाऱ्या डाळी महागल्या आहेत. यामुळे सर्वसामान्यांना त्या खरेदी करणेही अशक्य झाले आहे. सर्वाधिक विक्री तूर डाळीची होते. तूर डाळीने १०० चा आकडा पार केला आहे. ७० रूपयांपासून ते ११० रूपयांपर्यंत तूर डाळ विकली जात आहे. उडीद डाळ १०० रुपये किलोच्या घरात आहे. मूग डाळ ९० रुपये तर मूगाचा सोल १०० रूपयांच्या घरात आहे. मसूर डाळ ८० रुपये किलो आहे. हरभरा ६० रुपये, वटाना ५० रुपये तर बरबटी ६० रुपये किलो दराने विकली जात आहे. सर्वांचेच भाव वाढले आहे. गोंदिया : गारपीट आणि अवकाळी पावसाने राज्यातील दोन लाख टन कांदा सडला. त्याचा परिणाम आता बाजारपेठेवर जाणवू लागला आहे. सर्वसामान्यांच्या भोजनाचा अविभाज्य घटक असलेला कांदा यावर्षी वाढीव दराने रडविणार आहे. गत आठवड्यात ३० ते ३२ रुपये किलोच्या घरात असलेला कांदा या आठवड्यात ४० रूपयांपर्यंत वधारला आहे. या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यासोबतच बाजारात डाळींचे दरही कडाडले आहेत. हे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत.गतवर्षी लागवड करण्यात आलेला कांदा राज्यात वाया गेला. याचा परिणाम बाजारपेठेवर झाला आहे. जिल्ह्यातील कांद्याचे क्षेत्रही मोठ्या प्रमाणात घटल्याने बाजारात कांद्याचे दर चढले आहेत. ठोक बाजारात कांद्याचे दर ३० ते ३२ रुपये होते. चिल्लर बाजारात कांद्याचे दर ४० रुपये किलोच्या घरात राहीले. कांद्याच्या दरात झालेल्या दरवाढीने सर्वसामान्यांना मोठा फटका बसणार आहे. बहुतांश नागरिकांनी उन्हाळ्यात कांद्याचा साठा करून ठेवला. २५ ते ५० किलोपर्यंत १० ते १५ रुपये किलो दरात कांद्याची खरेदी केली. आता हा साठा संपत आल्याने त्यांना ४० रुपये किलोच्यावर दराने कांद्याची खरेदी करावी लागणार आहे. कांद्यांचा भाव गगणाला भिडल्याने सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी येत आहे. पुढे कांद्याचे भाव आणखी चढणार असल्याचे दिसून येत आहे. (शहर प्रतिनिधी)