शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात एक ठार, एक गंभीर ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:31 IST

सडक अर्जुनी : रानडुकराच्या हल्ल्यात एक जण ठार तर अस्वलाच्या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी (दि. ...

सडक अर्जुनी : रानडुकराच्या हल्ल्यात एक जण ठार तर अस्वलाच्या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी (दि. २२) सकाळी तालुक्यातील जांभळी दोडके येथे घडली. राधेश्याम भुवनलाल राणे (५५) असे रानडुकराच्या हल्ल्यात ठार झालेल्या तर पतिराम जगतराम उईके (४०) असे अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या इसमाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार वन विकास महामंडळांतर्गत जांभळी दोडके येथील कंपार्टमेंट क्रमांक ५११ मध्ये पतिराम जगतराम उईके (४०) यांच्यावर अस्वलाने हल्ला करून गंभीर झाला. त्याला केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. तर दुसरी घटना याच परिसरातील कंपार्टमेंट क्रमांक ५६० मध्ये घडली. रानडुकराच्या हल्ल्यात राधेश्याम भुवनलाल राणे (५५) यांचा मृत्यू झाला. या दोन्ही घटनामुळे वनविकास महामंडळाच्या जांभळी, दोडके परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा परिसर जंगलव्याप्त असल्याने या परिसरात नेहमीच वन्यप्राण्यांचा वावर असतो. तर मागील काही दिवसांपासून वन्यप्राण्यांच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. घटनेची माहिती मिळताच गोंदियाच्या विभागीय व्यवस्थापक दिव्या भारती, सहायक वन व्यवस्थापक अधिकारी अभिजित देशमुख, वन व्यवस्थापक मूलचंद नंदेश्वर, वनक्षेत्र सहायक व्यवस्थापक रमेश लांबट, वनपाल आर.एम. सोनवणे, जांभळीच्या वनरक्षक माया घासले, आनंद शेळके, भूमेश्वर कटरे, सिद्धेश्वर केंद्रे, संगम डांगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. वन्यप्राण्याच्या हल्ल्यात मृत्यू व गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.