शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

एकाची पडली भर तर ॲक्टिव्ह झाले आठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:36 IST

गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत असताना रुग्णसंख्येत पुन्हा हळूहळू वाढ होत असल्याने कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या आठवर ...

गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत असताना रुग्णसंख्येत पुन्हा हळूहळू वाढ होत असल्याने कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या आठवर पोहोचली आहे. त्यामुळे जिल्हावासीयांना अधिक सर्तक राहून काळजी घेण्याची व कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे.

कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने गुरुवारी (दि. ९) १७० नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यात ९४ नमुन्यांची आरटीपीसीआर तर ७६ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. त्यात एक नमुना कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्याचा पॉझिटिव्हिटी रेट ०.५ टक्के होता. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत ४४९१६८ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी २२९३७६ नमुन्यांची आरटीपीसीआर तर २१९७९२ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. त्यात ४१२११ नमुने कोरोना बाधित आढळले तर आतापर्यंत ४०४९७ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग हळूहळू वाढत आहे. त्यामुळे जिल्हावासीयांना अधिक काळजी घेण्याची गरज आहे.

.............

८४६७३४ नागरिकांचे लसीकरण

कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येत आहे. यातंर्गत जिल्ह्यातील १२५ केंद्रांवरून लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ८४६७३४ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

.................

पुन्हा कोरोनाला निमंत्रण देऊ नका

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या बऱ्याच प्रमाणात नियंत्रणात आहे. मात्र, सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत व इतर ठिकाणी नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे. सण उत्सव शांततेत पार पडण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करा. स्वत:ची आणि कुटुंबीयांची काळजी घ्या.

- राजेंद्र जैन, माजी आमदार

.................

सण उत्सव सुरळीत पार पडावे

नागरिकांनो आपले थोडेही दुर्लक्ष पुन्हा कोरोनाला निमंत्रण देणारे ठरु शकते. त्यामुळे स्वत:ची आणि कुटुंबांची काळजी घेत कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करा, मास्क, सॅनिटायझरचा वापर आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करा. सण उत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी सर्वांनी काळजी घेण्याची गरज आहे.

- विजय शिवणकर, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस.

................

गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा

सणासुदीचे दिवस असल्याने पुन्हा बाजारपेठेत गर्दी वाढू लागलीे आहे तर नागरिकांचे कोरोना प्रतिबंधात्मक नियमांकडे दुर्लक्ष होत आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष म्हणजे पुन्हा कोरोनाला निमंत्रण देणारे ठरू शकते. त्यामुळे सर्वांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे.

- सतीश बन्सोड, सामाजिक कार्यकर्ते.