शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

स्पीड लिमिट मोडणाऱ्यांना एक कोटींचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:36 IST

कपिल केकत गोंदिया : रस्त्यावर वाहन चालविण्यासाठी काही नियम ठरवून देण्यात आले असून, ते स्वत:सहसमोरील व्यक्तीच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे आहेत. ...

कपिल केकत

गोंदिया : रस्त्यावर वाहन चालविण्यासाठी काही नियम ठरवून देण्यात आले असून, ते स्वत:सहसमोरील व्यक्तीच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे आहेत. या अत्यंत महत्त्वाचा नियम म्हणजे वाहन सावकाश चालविणे. कारण भरधाव वेगात वाहन चालविणाऱ्यांचेच सर्वाधिक अपघात होतात व त्यातून कित्येकदा जिवावर बेतते हे दिसून येते. मात्र त्यानंतरही कित्येकच जण या नियमाचे उल्लंघन करून वाहनाने भरधाव वेगात चालवून स्वत:ला अति शहाणा ठरवून घेण्याचा प्रयत्न करतात. मात्र अशा लोकांवर आता महामार्ग पोलीस नजर ठेवून आहे व नियम तोडल्यास मात्र त्यांना दंड भरावा लागतो. या वर्षात महामार्ग पोलिसांनी अशा स्पीड लिमिट मोडणाऱ्या १०,१४४ वाहनांवर कारवाई केली असून, त्यांना एक कोटी एक लाख ४४ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

-----------------------------

महामार्गावर कोणत्या महिन्यात किती दंड

महिना दंड

जानेवारी- १५०००००

फेब्रुवारी- १६०००००

मार्च- १३०००००

एप्रिल- ००

मे- ३०४०००

जून- १६५००००

जुलै- २२९००००

ऑगस्ट- १५०००००

--------------------

धावत्या गाडीचा मोजा जातो वेग

महामार्गावर भरधाव वेगात धावणाऱ्या गाड्यांवर नजर ठेवण्यासाठी महामार्ग पोलिसांच्या वाहनावरच इंटरसेप्टर मशीन लावण्यात आले आहे. हे मशीन महामार्गाने ये-दा करणाऱ्या वाहनांना टिपत असते. अशात एखादे वाहन ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त वेगात जात असल्याने तेही मशीनमध्ये टिपले जाते व त्यावर कारवाई केली जाते.

----------------------------

एसएमएसवर मिळते माहिती

आजघडीला सर्वच क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान आले असून यात पद्धतीने महामार्ग पोलीसही अंमलात आणत आहेत. एखाद्या वाहनावर कारवाई करायची असल्यास त्या गाडीच्या क्रमांकावर संपूर्ण माहिती महामार्ग पोलिसांना मिळते. त्यानुसार महामार्ग पोलिसांकडून वाहनमालकाच्या मोबाइलवर मॅसेज पाठवून कळविते.