शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

पदाधिकाऱ्यांचे कुलूप ठोको आंदोलन उद्या

By admin | Updated: May 30, 2016 01:39 IST

येथील पंचायत समिती कार्यालयात प्रभारी गटशिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या स्वाती हवेले यांचा कार्यभार काढून...

अधिकाऱ्याचा विरोध : पं.स. पदाधिकारी रस्त्यावरअर्जुनी-मोरगाव : येथील पंचायत समिती कार्यालयात प्रभारी गटशिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या स्वाती हवेले यांचा कार्यभार काढून त्या ठिकाणी दुसऱ्याची नियुक्ती करण्यात यावी या मागणीसाठी पंचायत समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी ३१ मे रोजी पं.स. शिक्षण विभागाला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला आहे. कर्मचाऱ्यांच्या कामचुकार प्रणालीमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त आहे. परंतु जबाबदार पदसिध्द लोकप्रतिनिधी आपल्या अधिनस्त असलेल्या अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीने वैतागून गेल्याचे चित्र सध्या पंचायत समिती कार्यालयात पाहायला मिळत आहे. प्रभारी गटशिक्षणाधिकारी स्वाती हवेले यांचा पदभार काढण्यासाठी पंचायत समितीच्या १४ पदाधिकाऱ्यांना कुलूप ठोको आंदोलनाचा इशारा द्यावा लागला. सभापती अरविंद शिवणकर, उपसभापती आशा झिलपे यांच्यासह १४ पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांना निवेदन दिले. गशिअ हवेले यांच्या अयोग्य वागणुकीमुळे शिक्षण विभागात अनागोंदी कारभार सुरू आहे. जि.प. शाळेतील शैक्षणिक दर्जा वाढविण्याच्या हेतूने त्यांच्या कडून प्रभार काढण्यासाठी जिल्हा परिषदेला विनंती करण्यात आली. २७ जानेवारीच्या मासिक सभेत एकमताने ठराव पारित करण्यात आला. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी गावडे यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या कार्यप्रणालीची तक्रार करून पदभार काढण्याची विनंती करण्यात आली होती. सदर विषयाच्या अनूषंगाने जि.प. सर्वसाधारण सभेत चर्चा करून आठ दिवसात कार्यभार काढण्याचे आश्वासन देण्यात आले होते. सनदशीर मार्गाने मागणी करुन जि.प. प्रशासनाला जाग येत नाही. १४ ही पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने १८ मे रोजी जि.प.मध्ये जाऊन नव्याने रुजू झालेल्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना परिस्थिती सांगितली. त्यांनी तीन दिवसांत कार्यभार काढण्याचे आश्वासन दिले. प्रभारी गशिअ यांनी पं.स. प्रशासनास कोणतीही सूचना न देता २० ते २५ दिवस गायब राहिल्या. त्यामुळे बदल्यांच्या याद्या तयार करणे, शिक्षकांच्या समुपदेशनाने समायोजन करणे, २६ मे ला शिक्षकांचे समायोजन करायचे होते. परंतु गटशिक्षणाधिकारी यांच्यामुळे ते झाले नाही. लोकप्रतिनिधींना न जुमानता स्वैराचाराने कार्य करणाऱ्या हवेले यांचा कार्यभार तत्काळ काढण्यात यावा या मागणीसाठी पं.स. सर्व पदाधिकाऱ्यांनी ३१ मे रोजी पं.स. शिक्षण विभागाला कुलूप ठोकण्याचा इशारा देण्यात आला. (शहर प्रतिनिधी)