कपिल केकत ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नगर परिषदेने जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या वृक्ष लागवड अभियानाच्या प्रस्तावाला अद्याप प्रशासकीय मंजुरी मिळालेली नाही. जुलै महिना संपत येत असताना मंजुरी न मिळाल्याने नगर परिषदेची वृक्ष लागवडीची उद्दिष्टपूर्ती वांद्यात आली आहे. त्यातच, आतापर्र्यंत केवळ पाच हजार ५०० रोपट्यांची लागवड करण्यात आल्याची माहिती आहे.पर्यावरण संरक्षणासाठी वृक्ष लागवड हाच एकमेव पर्याय आहे. त्यासाठीच राज्य शासनाने यंदा १३ कोटी वृक्ष लागवड अभियान राबविण्याचा निर्धार केला. या अभियानांतर्गत नगर परिषदेला शहरात १२ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यासाठी नगर परिषदेने १.५० कोटींचे अंदाजपत्रक तयार करुन ते विभागीय वन अधिकाºयांकडे पाठविले होते. नगर परिषदेच्या या प्रस्तावाला जून महिन्यात विभागीय वन अधिकाºयांकडून तांत्रीक मंजुरी मिळाली. त्यानंतर हा प्रस्ताव प्रशासकीय मंजुरीसाठी जिल्हाधिकाºयांकडे पाठविण्यात आला. मात्र अद्यापही या प्रस्तावाला जिल्हाधिकाºयांची मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे नगर परिषदेचे १२ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट अपूर्ण असल्याचे चित्र आहे. प्रशासकीय मंजुरीअभावी वृक्ष लागवड अभियान थंडबस्त्यात असल्याची माहिती आहे. वृक्ष लागवड अभियानांतर्गत खड्डे खोदण्यापासून लावलेल्या रोपट्यांचे पुढील तीन वर्षांसाठी संगोपन असा हा कार्यक्रम असल्याने नगर परिषद एखाद्या संस्थेला हे काम देण्यास इच्छूक आहे. मात्र प्रशासकीय मंजुरी न मिळाल्याने आत्तापर्यंत केवळ ५ हजार ५०० रोपट्यांची लागवड करण्यात आली आहे.निविदा पुढे ढकललीएखाद्या एजंसीच्या माध्यमातून वृक्ष लागवड अभियान राबविण्याचे ठरवून नगर परिषदेने प्रशासकीय मंजुरीच्या अधिन राहून निविदा काढली होती. या अंतर्गत २१ जुलै रोजी ही निविदा उघडली जाणार होती. मात्र प्रशासकीय मंजुरी न मिळाल्याने निविदा उघडण्याची तारीख पुढे वाढविण्यात आली आहे. आता निविदा टाकण्याचा अंतिम तारीख ३१ जुलै करण्यात आली असून २ आॅगस्ट रोजी निविदा उघडण्यात येणार असल्याची माहिती आहे.
मंजुरीत अडकले नगर परिषदेचे उद्दिष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 22:00 IST
नगर परिषदेने जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या वृक्ष लागवड अभियानाच्या प्रस्तावाला अद्याप प्रशासकीय मंजुरी मिळालेली नाही. जुलै महिना संपत येत असताना मंजुरी न मिळाल्याने नगर परिषदेची वृक्ष लागवडीची उद्दिष्टपूर्ती वांद्यात आली आहे. त्यातच, आतापर्र्यंत केवळ पाच हजार ५०० रोपट्यांची लागवड करण्यात आल्याची माहिती आहे.
मंजुरीत अडकले नगर परिषदेचे उद्दिष्ट
ठळक मुद्देन.प.चे अभियान वांद्यात : केवळ ५५०० हजार रोपट्यांची लागवड