शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

चार महिन्यांपासून अडले पोषण आहाराचे मानधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2016 02:07 IST

बालकांना पुरविण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहाराचा निधी शाळांना वेळेवर मिळत नसल्याने मुलांच्या मध्यान्ह भोजनाची व्यवस्था कशी करायची,

गोंदिया : बालकांना पुरविण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहाराचा निधी शाळांना वेळेवर मिळत नसल्याने मुलांच्या मध्यान्ह भोजनाची व्यवस्था कशी करायची, असा प्रश्न मुख्याध्यापकांना पडतो. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी व मार्च या चार महिन्याचे शालेय पोषण आहाराचे मानधन न मिळाल्याने किती उसनवारी करून मुलांना मध्यान्ह भोजन द्यायचे, असा प्रश्न पडला आहे. दरवर्षी २६ जून पासून शाळा सुरू होतात. परंतु सुरूवातीला ही मुख्याध्यापकांकडे शालेय पोषण आहाराचे पैसे शासन देत नसल्यामुळे मुख्याध्यापकांना वारंवार आपल्याच खिश्यातील पैसे वापरावे लागतात. तांदूळ व धान्यादी कडधान्य शासनाकडून पूरविले जाते. परंतु हे अन्न शिजविण्यासाठी लागणारे इंधन भाजीपाला व इतर साहित्य खरेदी करण्यासाठी तसेच पोषण आहार शिजविणाऱ्या महिलांना मानधन देण्यासाठी शासनाकडून पैसे दिले जाते. परंतु शासन वेळेवर पैसे देत नसल्याने शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या महिलांना नेहमीच आर्थिक टंचाईत रहावे लागते. तर मुख्याध्यापकांना ही मध्यान्ह भोजनाच्या सोईसाठी कसरत करावी लागते. शासनाने यावर्षी शाळासाठी तीन टप्यात निधी पाठविलेला आहे. मार्च ते जून २०१५ या कालावधीतील पोषण आहारासाठी केंद्राने २ कोटी ३३ लाख ३२ हजार तर राज्यशासनाने ७५ ुलाख ९० हजार रुपये दिले आहे. दुसऱ्या टप्यात जुलै ते नोव्हेंबर या महिन्यातील शालेय पोषण आहाराचे केंद्राने ५ कोटी ५१ लाख ८५ हजार तर राज्याने १ कोटी ८८ लाख १ हजार रुपये १९ सप्टेंबरला शाळांना दिले. त्यानंतर तिसऱ्या टप्यात डिसेंबर ते फेब्रुवारी या तीन महिन्याचे मानधन मार्चपर्यंत झाले नाही. मार्च एडिंग तोंडावर असताना केंद्रशासनाने २२ मार्च रोजी १ कोटी ९९ लाख ९२ हजार रुपये तर राज्य सरकारने १ कोटी ७० लाख ६१ हजार रुपये गोंदिया जिल्हा परिषदेला पाठविले आहे.