शहरं
Join us  
Trending Stories
1
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
2
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
3
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
4
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
5
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
6
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
7
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
8
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
9
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
10
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
11
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
12
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
13
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
14
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
15
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
16
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
17
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
18
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
19
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
20
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री

घटत चालली मुलींची संख्या

By admin | Updated: October 26, 2015 01:47 IST

मुलींना वाचविण्यासाठी शासन-प्रशासन सर्व प्रयत्न करीत आहेत. मात्र यानंतरही क्रूरता आपली सीमा सोडू शकली नाही.

१,००५ वरून ९२४ पर्यंत लिंगदरात घटलोकमत विशेष

दिेवानंद शहारे  गोंदियामुलींना वाचविण्यासाठी शासन-प्रशासन सर्व प्रयत्न करीत आहेत. मात्र यानंतरही क्रूरता आपली सीमा सोडू शकली नाही. केंद्र शासनाच्या आदेशानुसार यावर्षी १९ जानेवारीपासून ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियान सुरू झाले. यानंतरही जिल्ह्यात भयावह वास्तव समोर येत आहे. एकीकडे शिक्षण क्षेत्रात सुधारणा झाली व होत आहे. परंतु दुसरीकडे लिंगदरात विशेष सुधारणा दिसून येत नाही. सन २०११ मध्ये प्रति एक हजार पुरूषांमागे एक हजार पाच मुली होत्या. या संख्येत आता घट होऊन ही संख्या ९२४ वर आली आहे.‘डीएचआयएस-२’ च्या संबंधितांकडून मिळालेल्या संख्येनुसार, वर्ष २०१४-१५ मध्ये जिल्ह्यात १८ हजार ९६७ प्रसूतींमध्ये १९ हजार ८९ बालकांचा जन्म झाला. यात ९ हजार ७५८ मुले तर ९ हजार १६ मुलींचा समावेश आहे. त्यावर्षी केवळ डिसेंबर महिन्यात प्रति हजार पुरूषांमध्ये १ हजार २२ मुली होत्या. एप्रिल, मे, जून, जुलै, आॅक्टोबर, नोव्हेंबर व मार्च महिन्यात मुलींचा जन्मदर ९२३ ते ९७३ च्या दरम्यान नोंद करण्यात आला होता. आॅगस्टमध्ये ८९८, सप्टेंबरमध्ये ८९३, जानेवारीमध्ये ८५३ व फेब्रुवारीमध्ये सर्वात कमी ७९१ नोंद करण्यात आली होती. तर वर्ष २०१५-१६ मध्ये आतापर्यंतच्या लिंगदराच्या संख्येत सुधारणा दिसून येत आहे. प्रति एक हजार मुलांमागे ९७० मुलींचा जन्म झाला. मे, जून महिन्यात स्थिती उत्तम पाहण्यात आली. परंतु एप्रिल, जुलै, आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यांत स्थिती खूप वाईट राहिली. यावर्षी आतापर्यंत ८ हजार ९६४ प्रसूतींमध्ये ९ हजार ३१ बालकांचा जन्म झाला. यात ४ हजार ४८६ मुले व ४ हजार ३५२ मुलींचा समावेश आहे. उर्वरित बालकांचा मृत्यू जन्माबरोबरच झाला. अर्भकांच्या मृत्यूंत वाढजिल्ह्यात सन २०१४-१५ मध्ये आतापर्यंत लिंगदरामध्ये सुधारणा पाहण्यात आली आहे. परंतु नवजात बाळांच्या मृत्यूंची संख्या ०.४८ टक्के वाढली आहे. मागील वर्षी १९ हजार ८९ बालकांचा जन्म झाला होता. यापैकी ३१५ (१.६५ टक्के) अर्भकांचा मृत्यू झाला. तर यावर्षी आतापर्यंत नऊ हजार ३१ मधून १९३ (२.१३ टक्के) अर्भकांचा मृत्यू झाला आहे.