शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
2
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
3
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
4
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
5
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
8
राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती
9
"भाषा धोरणात भाजपाचा दुटप्पीपणा उघड, गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी?’’ काँग्रेसचा सवाल   
10
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
11
Ashadhi Ekadashi 2025: वारकऱ्यांनी घेतली प्रेमानंद महाराजांची भेट, म्हणाले आमचा विठू तुमचा कृष्ण एकच!
12
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
13
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीची माहिती, ऑपरेशन सिंदूरमध्ये बजावली मोठी भूमिका; कोण आहेत 'रॉ'चे नवे बॉस पराग जैन?
14
सिंधुदुर्गातील घनदाट जंगलात सापडला मानवी सांगाडा, मृतदेह कुणाचा? तपासातून समोर आली धक्कादायक माहिती
15
Railway Job: रेल्वेत नोकरीची संधी, सहा हजारांहून अधिक पदं भरली जाणार, लगेच करा अर्ज!
16
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
17
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
18
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
19
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
20
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार

आता पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना अच्छे दिन

By admin | Updated: August 26, 2015 01:51 IST

पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांच्या सुट्टीच्या दिवशी कर्तव्य पार पाडल्यास देण्यात येणाऱ्या भत्यात वाढ करण्यात आली आहे.

दैनिक भत्त्यात वाढ : साप्ताहिक सुटीचा मोबदला आंधळगाव : पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांच्या सुट्टीच्या दिवशी कर्तव्य पार पाडल्यास देण्यात येणाऱ्या भत्यात वाढ करण्यात आली आहे. पोलीस कर्मचारी व अधिकारी यांना गणेशोत्सव, ईद, नवरात्र, दिवाळी, शारदोत्सव व राजकीय स्तरावरील महत्वाच्या व्यक्तींची सुरक्षा, व्यवस्था व जिल्ह्यात विविध शहर व व्हिआयपी बंदोबस्ताकरीता कर्तव्याचा कालावधी हा बऱ्याचदा १२ तासाचा अथवा त्यापेक्षा जास्त काळ बंदोबस्तात घालवावा लागतो. अपूऱ्या मनुष्यबळामुळे पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुट्या नेहमी रद्द केल्या जातात. आता त्यांना साप्ताहिक सुटीच्या मोबदल्यात देण्यात येणाऱ्या भत्त्यांमध्ये वाढ करणारा निर्णय राज्य शासनाच्या गृहविभागाने ६ आॅगस्ट रोजी एका आदेशान्वये घेतला आहे.राज्यातील वाढती लोकसंख्या, वाढते शहर, औद्योगिक कारभार तसेच राज्यातील विविध धार्मिक उत्सव, सणासह आदी बऱ्याच सांस्कृतिक, राजकीय, विविध समाजाचे सांस्कृतीक कार्यक्रम, महापुरूषांच्या जयंती, अनुचित घटना घडल्यास ठेवण्यात आलेला बंदोबस्तात पोलीसांसह वरिष्ठ अधिकारी यांना या कामाकरिता कर्तव्य बजावावे लागतात. त्यामुळे १२ तास किंवा त्यापेक्षा जास्त काळ पोलीस यंत्रणा सज्ज असते. त्यासाठी त्यांच्या सुट्या सुद्धा रद्द केल्या जातात. गृह विभागाच्या जुलै २००४ च्या आदेशान्वये पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना साप्ताहिक सुटीच्या मोबदल्यात वेतनश्रेणीनुसार दैनिक भत्ता अल्प प्रमाणात दिला जातो. त्याकरीता आता शासनाने त्यात सुधारणा करून दैनिक भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.