शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

आता लक्ष्य मारहाणमुक्त गावाचे

By admin | Updated: May 12, 2014 23:51 IST

व्यक्ती किंवा गटातील तंटे मिटवून गावात शांतता निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेला गावातील सज्जन व्यक्तींची साथ मिळाली.

गोंदिया : व्यक्ती किंवा गटातील तंटे मिटवून गावात शांतता निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेला गावातील सज्जन व्यक्तींची साथ मिळाली. या मोहिमेला महिलांचा हातभार लागल्याने गाव शांततेच्या मार्गावर चालू लागले आहे. तरीदेखील गावात मारहाणीची प्रकरणे वाढू लागली आहेत. या मारहाणीवर आळा घालण्यासाठी राज्य शासन आता मारहाणमुक्त गावाचे लक्ष्य ठेवत आहे.

गावात तंटे निर्माण होऊ नयेत यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेचे सदस्य प्रयत्न करीत असले तरी कौटुंबिक पातळीवरील वादांमध्ये तोडगा काढण्यावर तंटामुक्त समित्यांना र्मयादा येत आहेत. कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना चार भिंतींच्या आत होत असल्याने ही प्रकरणे वाढत आहेत. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झाले असले, तरी गावात शंभर टक्के शांतता प्रस्थापित झाली नाही. जुने तंटे मिटवून नवीन तंटे उद्भवणार नाहीत याची काळजी मोहीम राबविणारे नागरिकच घेत आहेत.

या पार्श्‍वभूमीवर पंचायतमधील महिला प्रशिक्षण आणि संघटनांच्या क्षेत्रात काम करणारी महिला राजसत्ता आंदोलने मारहाणमुक्त गाव ही संकल्पना राबवीत आहे. महिलांवरील हिंसाचाराच्या तक्रारी लक्षात घेता गावामध्ये ५0 सदस्य असतील. अशी राजसत्ता आंदोलनाची प्रत्येक गावात एक शाखा उघडली जाणार आहे. या शाखेची पंधरवड्यात एक बैठक घेण्यात येणार आहे. या शाखेकडे कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार आल्यावर प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केला जातो. हे प्रकरण या शाखेकडे सुटले नाही तर ते महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीकडे येते. समितीत तडजोड झाले नाही तर हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंंत जाते. तेथेही तोडगा निघाला नाही तर तालुका पातळीवर शिष्टमंडळ तयार करून प्रयत्न केला जातो. समाजातील स्त्री किंवा पुरुषाला मारहाण केले जाऊ नये यासाठी प्रयत्न केले जातात. हा मारहाणीचा मुद्दा ग्रामसभेत मांडावा, एकमेकाने एकमेकाकडे लक्ष ठेवावे लागत आहे. कोणत्याही समस्येचा निकाल वर्षभरात लागावा, अशी या मागची भूमिका आहे. मारहाणमुक्त गावाबरोबर बालविवाहमुक्त गाव, भ्रूणहत्यामुक्त गाव याही संकल्पना राबविण्याचा मानस शासनाचा आहे. प्रत्येक घरात शांतता नांदण्यासाठी शासनाने उचललेले पाऊल योग्य आहे. (तालुका प्रतिनिधी)