शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या न. प. कर्मचाऱ्यांना मास्क लावण्याचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 05:00 IST

मागील आठ दिवसांत त्यांनी ८७६ लोकांवर दंडात्मक कारवाई ८७ हजार रुपयांचा दंड वसूल केला. ही कारवाई योग्य नसून स्वागतार्ह आहे. कोरोना नियमांचे पालन आणि शिस्त लावण्यासाठी ही कारवाई केली जात आहे, पण कारवाई करणाऱ्यांनीसुध्दा नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. नगर परिषदेचे कर्मचारी विनामास्क कार्यालयात वावरतात. त्यामुळे त्यांनीसुध्दा नियमाचे पालन करणे गरजेचे आहे. तर ही बाब पोलिसांनादेखील लागू होते.

ठळक मुद्देबहुतके कर्मचारी मास्कविना : यांच्यावर कारवाई करणार कोण, सर्वसामान्यांचा सवाल

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. मास्कचा वापर न करणाऱ्यांवर नगर परिषद कर्मचारी व पोलीस दंडात्मक कारवाई करून मास्कचा वापर करण्याचा सल्ला देत आहेत, पण हा सल्ला आणि नागरिकांवर दंडात्मक कारवाई करणाऱ्या नगर परिषद कर्मचाऱ्यांना मास्क लावण्याचा विसर पडला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसाठी एक नियम आणि नगर परिषद कर्मचाऱ्यांसाठी वेगळा नियम का, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. मागील आठ ते दहा दिवसांपासून विनामास्क वावरणाऱ्यांवर नगर परिषद कर्मचारी आणि पोलीस दंडात्मक कारवाई करीत आहेत. शहरातील मुख्य चौक, बाजारपेठ आणि शहरात प्रवेश करणाऱ्या मुख्य मार्गावर हे कर्मचारी तैनात आहेत. मागील आठ दिवसांत त्यांनी ८७६ लोकांवर दंडात्मक कारवाई ८७ हजार रुपयांचा दंड वसूल केला. ही कारवाई योग्य नसून स्वागतार्ह आहे. कोरोना नियमांचे पालन आणि शिस्त लावण्यासाठी ही कारवाई केली जात आहे, पण कारवाई करणाऱ्यांनीसुध्दा नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. नगर परिषदेचे कर्मचारी विनामास्क कार्यालयात वावरतात. त्यामुळे त्यांनीसुध्दा नियमाचे पालन करणे गरजेचे आहे. तर ही बाब पोलिसांनादेखील लागू होते. एखादा दुचाकीचालक विनामास्क दिसला की, लगेच त्याच्यावर कारवाई केली जाते. पण विना मास्क वावरणाऱ्या पोलिसांवर कारवाई करणार कोण, हा प्रश्न देखील कायम आहे. त्यामुळे नगर परिषद कर्मचाऱ्यांना सुध्दा शिस्त लावण्याची मागणी केली जात आहे. 

टक्के कर्मचारी विनामास्कगोंदिया नगर परिषदेला शुक्रवारी प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली असता मालमत्ता कर, बांधकाम, नगर रचना, अकाऊंट विभागातील अनेक कर्मचारी विनामास्क वावरताना आढळले. उपस्थित कर्मचाऱ्यांपैकी ४० टक्के कर्मचाऱ्यांनी मास्कचा वापर करण्याकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना कोरोनाचे गांभीर्य अद्यापही कळले नसून यांना शिस्त लावणार कोण, असा प्रश्न सवाल उपस्थित केला जात आहे. 

नगर परिषदेत कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांना कार्यालयात व कार्यालयाबाहेरसुध्दा नियमित मास्क वापरण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच यानंतरही जर कर्मचारी मास्क लावत नसतील तर त्यांच्यावर सुध्दा निश्चितच दंडात्मक कारवाई करण्यात येईल. नियम सर्वांसाठीच सारखेच आहेत. - करण चव्हाण, मुख्याधिकारी नगर परिषद गोंदिया. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या