शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाइन नोंदणी न करणे शेतकऱ्यांना भोवणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:36 IST

गोंदिया : शासनाच्या महसूल विभागाकडून दिलेल्या मोबाईल ॲपवर ई-पीक पाहणीची नोंद न केल्यास, शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या संकटांना तोंड द्यावे ...

गोंदिया : शासनाच्या महसूल विभागाकडून दिलेल्या मोबाईल ॲपवर ई-पीक पाहणीची नोंद न केल्यास, शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या संकटांना तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे, नोंद न केल्यास शेती पडीक अथवा पेरणी केलीच नाही, असे गृहीत धरले जाणार आहे. पीककर्ज घेताना अनेक अडथळे येण्याची शक्यता आहे, याशिवाय नैसर्गिक आपत्तीने हानी झाल्यास मिळणारी नुकसान भरपाई, पीकविमा, वन्य प्राण्यांनी नासाडी केल्यास मिळणाऱ्या अर्थसाह्याला शेतकऱ्यांना मुकावे लागण्याची वेळ येऊ शकते.

गोंदिया जिल्ह्यात शासन नोंदीनुसार, २ लाख ७२ हजार १७८ शेतकरी आहेत. त्यात एकूण क्षेत्राच्या १ लाख ७८ हजार १८ हेक्टरमध्ये धानाची लागवड करण्यात आली आहे, तर ५ हजार ६९५ हेक्टर क्षेत्रात तूर, ६७ हेक्टरमध्ये मका, तीळ ९०० हेक्टर, ऊस ७०० हेक्टर, कापूस २ हेक्टर, भाजीपाला ६५० हेक्टर, हळद २८४ हेक्टर, आले ११३ हेक्टर, केळी व पपई ३० हेक्टर, तर २५ हेक्टर क्षेत्रात सुगंधित वनस्पतीची लागवड करण्यात आल्याची नोंद कृषी विभागाच्या अहवालात आहे. असे असताना जिल्ह्यात आतापर्यंत ७५ हजार ७६२ खातेदार शेतकऱ्यांनी मोबाईल ॲप्लिकेशन डाऊनलोड केल्याची नोंद करण्यात आली आहे. पैकी ७० हजार ८१२ शेतकरी सक्रिय असून, ४ हजार ९५० खातेदार शेतकरी निष्क्रिय असल्याची नोंद आहे. एकंदरीत, जिल्ह्यातील सातबारा धारक नोंदणीकृत शेतकऱ्यांची संख्या पाहता, आतापर्यंत ई-पीक पाहणी मोबाईल ॲप्लिकेशन डाऊनलोड केलेल्या शेतकऱ्यांची संख्या तोकडी आहे. आता सदर नोंदणी करण्याची मुदत काही दिवस शिल्लक असल्याने, बऱ्याच शेतकऱ्यांना ई-पीक पाहणीपासून मुकावे लागण्याची लागण्याची शक्यता आहे.