शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

ताप आणि लसीकरणाचा संबंधच नाही, दोन्ही लसी सुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:36 IST

गोंदिया : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात असतानाच देशात सध्या जोमात लसीकरण सुरू आहे. त्यानुसार, जिल्ह्यातही लसीकरण केले ...

गोंदिया : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात असतानाच देशात सध्या जोमात लसीकरण सुरू आहे. त्यानुसार, जिल्ह्यातही लसीकरण केले जात आहे. जिल्ह्यात कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड या दोन लसींद्वारे लसीकरण सुरू आहे. मात्र, कोरोनाची लस घेतल्यानंतर ताप आला म्हणजे लस खरी असून तिचा प्रभाव सुरू झाला, तर ताप न आल्यास लस खोटी असून तिचा काहीच फायदा नाही अशा प्रकारचे संभ्रम नागरिक बाळगून आहेत. मात्र, लस घेतल्यानंतर ताप येणारच असे काहीच नसून, प्रत्येकाच्या रोग प्रतिकराक शक्तीवर ते अवलंबून आहे असे म्हणता येईल. मात्र, ताप आल्यावरून लस खरी की खोटी हा केवळ एक संभ्रम आहे. अशात नागरिकांनी हा संभ्रम व लसीकरणाला घेऊन असलेली भीती बाजूला सारून सर्वप्रथम लस घेऊन स्वत:ला सुरक्षित करणे गरजेचे आहे.

---------------------------------

आतापर्यंत झालेले लसीकरण

पहिला डोस - ६४२८०७

दोन्ही डोस- २०३९२७

कोव्हॅक्सिन - ४६९७४६

कोविशिल्ड -३७६९८८

------------------------------

कोविशिल्डचा त्रास अधिक

कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या लसींचाच वापर जिल्ह्यात सध्या सुरू आहे. यातही कोविशिल्डचे सर्वाधिक लाभार्थी जिल्ह्यात आहेत. यात कोविशिल्डचा जास्त त्रास असल्याचे बोलले जात आहे. मात्र, असे काहीच नसून, दोन्ही लसी अत्यंत सुरक्षित असून, कोविशिल्डमुळे जास्तीचा काहीच त्रास होत नाही.

------------------------------

लसीनंतर काहीच झाले नाही...

कोरोनाची लस घेतल्यानंतर ताप येतो असे सांगितले जात असून, कित्येकांना बघितलेही आहे. मात्र, मी लस घेतल्यानंतर मला काहीच त्रास झाला नाही. अंगदुखी, डोकेदुखी व ताप अशी काहीच लक्षणे मला दिसून आली नाही. विशेष म्हणजे, दुसरा डोस घेतल्यानंतरही मला काहीच त्रास जाणवला नाही.

- जयेश गणवीर

-------------------------

कोरोना लसीचा पहिला डोस घेतल्यावर ताप येतो असे बघितले आहे. मात्र, मी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेऊनही मला ताप किंवा अन्य काही त्रास जाणवला नाही. काही लोकांना ताप येतो, मात्र सर्वांनाच येणार असे दिसत नाही.

- सुरेश खरे

---------------------

त्रास झाला तरच परिणामकारक असे अजिबात नाही...

लस घेतल्यावर त्रास झाला म्हणजे लस परिणामकारक आहे असे काहीच नाही. दोन्ही लसी अत्यंत प्रभावी व सुरक्षित असून, लवकर प्रत्येकाने लसीकरण करून घेण्याची गरज आहे.

- डॉ. नितीन कापसे

जिल्हा आरोग्य अधिकारी, गोंदिया.