शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

सिकलसेल तपासणी किटच नाही!

By admin | Updated: August 21, 2016 00:05 IST

पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आजारांवर मात करण्यासाठी जिल्ह्यात पुरेसा औषधीसाठा उपलब्ध आहे.

पिवळ्या गोळ्यांवर बंदी : पाण्याचे शुध्दीकरण करणारे मेडिक्लोर दिलेच नाहीगोंदिया : पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आजारांवर मात करण्यासाठी जिल्ह्यात पुरेसा औषधीसाठा उपलब्ध आहे. मात्र विदर्भात सर्वात जास्त सिकलसेल रूग्णांची संख्या गोंदिया जिल्ह्यात असताना या जिल्ह्यात सिकलसेलग्रस्त रुग्णांची तपासणी करण्यासाठी आवश्यक असलेली किट उपलब्ध नाही. त्यामुळे सिकलसेलचे रूग्ण ओळखण्याची प्रक्रिया कशी करावी असा प्रश्न आरोग्य यंत्रणेला पडला आहे. जिल्ह्यातील सिकलसेल रूग्णांची तपासणी करण्यासाठी नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयातून सोलोबिलिटी बफर सोल्युशन आणण्याची तयारी आहे. परंतु या सोल्युशनची गुणवत्ता मुदत फक्त दोन दिवसांची असते. त्यामुळे ते बफर सोल्युशन आणणे परवडण्यासारखे नाही. स्थानिक स्तरावर ही किट कुठेही उपलब्ध नाही. त्यामुळे सिकलसेल रुग्णांच्या बाबतीत आरोग्य विभागाची उदासीनता दिसून येत आहे.पावसाळ्याच्या दिवसात अशुद्ध पाण्यामुळे सर्वात जास्त हागवणीच्या तक्रारी सुरू होतात. परंतु त्यावर रामबाण उपाय समजल्या जाणाऱ्या सर्वपरिचित पिवळ्या गोळ्यांवर जागतिक आरोग्य संघटनेने बंदी घातल्यामुळे मागील दोन वर्षापासून त्या गोळ्या देण्यात येत नाही. परंतु त्याऐवजी पर्यायी व्यवस्था अ‍ॅन्टीबॉयटीक मेट्राजिल या गोळ्या देण्यात येतात. त्याचा पुरेसा साठा असल्याचे सांगण्यात आले. पावसाळ्यात पाण्यामुळे सर्वात जास्त आजार जडत असतात. पाणी शुध्द करून प्यावे असे आरोग्य विभागातर्फे आवाहन करण्यात येते. परंतु यावर्षी राष्ट्रीय ग्रामीण पाणी पुरवठा योजनेंतर्गत मेडिक्लोर वाटप करण्यात आले नाही. त्यासाठी पावसाचे पाणी शुध्द न करताच ग्रामीण भागात ते पाणी पिले जात आहे. या मेडीक्लोरची ६ महिन्यांची मुदत असते. ते पुरविण्याचे आदेश दिल्यावर पोहोचण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागत असल्याने पाच महिन्यात वाटप करून ते वापरले जाणे आवश्यक असते. परंतु यावर्षी पावसाळा संपत येत असला तरी मेडीक्लोर जिल्ह्यात आल्या नाही. किशोरवयीन विद्यार्थ्यांना आयर्नच्या गोळ्या देण्यासाठी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी १ कोटी २९ लाख गोळ्या वाटप केल्या आहेत. सिकलसेल तपासणी इलेक्ट्रोफोरेसिस मशीनने करता येते. परंतु ही सेवा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रात कार्यरत नाही. (तालुका प्रतिनिधी)- ३५८ प्रकारच्या औषधींची मागणीसार्वजनिक आरोग्य विभागाने सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांनी ३५८ प्र्रकारच्या औषधी मागविण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार जिल्ह्यातील ४० प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत ३५८ प्रकारच्या औषधी शासनाकडे आॅनलाईन पध्दतीने प्राथमिक आरोग्य केंद्रांनी मागितल्या आहेत. मात्र त्या अद्याप उपलब्ध झालेल्या नाहीत.सोशल आॅडिट कराजिल्ह्यात ११ लाख अ‍ॅन्टीबॉयोटीकच्या गोळ्या वाटप करण्यात आल्या. एका उपकेंद्रात एक आरोग्य सेविका, एक सहाय्यक आरोग्य सेविका तर एक आरोग्य सेवक असतो. त्या तिघांपैकी प्रत्येकाने दररोज १० गोळ्या वाटप केल्या तर महिन्याकाठी ९०० गोळ्या एका उपकेंद्रामार्फत वाटल्या जाऊ शकतात. परंतु काही उपकेंद्रातील कर्मचारी काम करीत नसल्यामुळे त्यांच्या कामाचे सोशल आॅडीट करावे अशी कुजबूज आरोग्य विभागात सुरू आहे.