शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

चार दिवसांपासून ‘नो विड्रॉल’

By admin | Updated: November 19, 2016 00:45 IST

गोंदिया डिस्ट्रिक्ट को-आॅपरेटिव्ह बँक शाखा सातगाव येथे १५ नोव्हेंबरपासून पैसे मिळत नसल्याने खातेधारक त्रस्त झाले आहेत.

खातेधारक त्रस्त : गोंदिया डिस्ट्रिक्ट को-आॅपरेटिव्ह बँकेतील प्रकारसाखरीटोला : गोंदिया डिस्ट्रिक्ट को-आॅपरेटिव्ह बँक शाखा सातगाव येथे १५ नोव्हेंबरपासून पैसे मिळत नसल्याने खातेधारक त्रस्त झाले आहेत. स्वत:चेच पैसे बँकेत असून ते मिळत नसल्याने लोकांनी आर्थिक व्यवहार कसा करावा, असा प्रश्न त्यांना पडला आहे. सालेकसा तालुक्यातील साखरीटोला (सातगाव) येथे मध्यवर्ती बँकेची शाखा कार्यरत आहे. सदर शाखेतून कर्मचाऱ्यांचे वेतन दिले जाते. तसेच ग्रामपंचायत, शेतकरी, विविध ठिकाणी काम करणारे मजूर अशा अनेक लोकांचे खाते या बँकेत आहेत. मात्र मागील १५ नोव्हेंबरपासून सदर शाखेतून विड्राल देणे बंद केल्याने बरेच लोक अडचणीत आले आहेत. पैसे मिळत नसल्याने अनेक लोकांचे आर्थिक व्यवहार ठप्प पडले आहेत.मागील ९ नोव्हेंबरपासून शासनाने पाचशे व हजारांच्या नोटांवर बंदी आणली. शासनाच्या या निर्णयाचे जनसामान्यांनी स्वागत केले असले तरी बँकेतून विड्राल करण्यासाठी सर्वसामान्य माणसाला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यातही मध्यवर्ती बँकेत ‘नो विड्राल’ अशी परिस्थिती आहे. तसेच सदर बँकेने जुन्या पाचशे व हजारांच्या नोटा घेणेसुद्धा बंद केले आहे. त्यामुळे अनेक लोक बँक आॅफ महाराष्ट्र शाखेमध्ये जाऊन नोटा बदलवित आहेत. या प्रकाराने बँक आॅफ महाराष्ट्र शाखेत लोकांची गर्दी वाढली आहे. साखरीटोला येथे बँक आॅफ महाराष्ट्रची एक शाखा असून सदर बँकेत लोकांची रोज गर्दी असते. या बँकेद्वारे लोकांना दोन ते चार हजारांचे विड्राल दिले जाते. मात्र त्यासाठी नागरिकांनी गर्दीचा सामना करण्याची वेळ आली आहे. आदिवासी सहकारी सोसायटी एका मर्यादेच्या वर धान खरेदी करीत नाही. सोसायटीकडेसुद्धा नवीन करन्सी पोहोचलेली नाही. तसेच मध्यवर्ती बँकेत सोसायटीचे खाते असून सदर बँकेमार्फत शेतकऱ्यांना पैसा पुरविला जातो. मात्र सध्या तरी ‘नो विड्राल’ ने परिस्थिती गंभीर आहे. अधिक माहिती घेतली असता मध्यवर्ती बँकेचे २५ कोटी रुपये गोदिया शाखेतच पडून असून शासनाने अद्याप सदर बँकेला नवीन नोटांचा पुरवठा केला नसल्याचे कळले. त्यामुळे सदर परिस्थिती निर्माण झाल्याचे बोलले जाते.शासनाच्या नोटा बंदीच्या निर्णयाचे समर्थन जरी होत असले तरी त्यामुळे सर्वसामान्य माणसांची हेळसांड होत आहे. त्यामुळे जनता त्रस्त झाली असल्याचे दिसून येत आहे.नोटाबंदीचा शेतकऱ्यांना फटकानोटाबंदीचा फटका शेतकरी वर्गाला बसल्याचे चित्र पहायला मिळते. सध्या धान उत्पादक शेतकऱ्यांनी धानाची कापणी व मळणी केली असली तरी त्यांचे धान खरेदी केले जात नाही. धान खरेदी करणारे व्यापारी यांच्याकडेसुद्धा कॅश नसल्याने शेतकऱ्यांचे धान खरेदी करण्यात अडचणी निर्माण झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. ज्यांचे धान खरेदी करण्यात आले अशा शेतकऱ्यांना धानाचे पैसे मिळत नसल्याची ओरड आहे.