शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
3
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
4
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
5
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
6
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
7
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
8
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
9
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
10
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
11
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
12
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
13
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
14
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
15
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
16
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
17
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
18
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
19
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 

महापुरूषांच्या विचारांपेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही

By admin | Updated: January 17, 2017 00:56 IST

देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात स्वत:चे प्राण बलिदान करणारे महापुरुष व समाजातील नागरिकांसाठी ज्यांनी आपल्या ...

संजय पुराम : ज्योतिबा व सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याचे अनावरणदेवरी : देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात स्वत:चे प्राण बलिदान करणारे महापुरुष व समाजातील नागरिकांसाठी ज्यांनी आपल्या थोर विचारांनी समाजात चांगल्या विचारांची बीज रोपण करुन समाजाला योग्य दिशा दाखवण्याचे कार्य ज्या महापुरुषांनी केले, त्या महापुरुषांच्या विचारांपेक्षा आम्ही मोठे नाही, असे प्रतिपादन आमगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांनी केले. तालुक्यातील चिचगड जि.प. क्षेत्रांतर्गणत गरारटोला येथे महात्मा ज्योतिबा फुले माळी महासंघाद्वारे आयोजित महात्मा ज्योुयबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विदर्भ माळी महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. राजेंद्र महाडोरे होते. अतिथी म्हणून जिल्हा माळी संघाचे अध्यक्ष अनिल डोंगरवार, किशोर देशकर, महिला अध्यक्ष गायत्री इरले, भाजपा तालुकाध्यक्ष प्रमोद संगीडवार, भाजयुमोचे तालुका महामंत्री कुलदीप लांजेवार, से.नि.नायब तहसीलदार देविदास गुरुनुले, माजी सभापती कामेश्वर निकोडे, माळी महासंघाचे तालुकाध्यक्ष यशवंत गुरुनुले, सरपंच चंद्रकला कावळे, शालीकराम गुरुनुले, एकनाथ सोनुले, माजी सरपंच प्रेमचंद गुप्ता, कृषी सहाय्यक हटवार, भाजपचे तालुका महामंत्री विनोद भेंडारकर आदी उपस्थित होते. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी अध्यक्ष अ‍ॅड. महाडोरे यांनी शिक्षणक्षेत्रात फुले दामपत्यांनी केलेल्या कार्याची व समाज सुधारणेसाठी केलेल्या कार्याची जाणीव करुन दिली. त्यांचे विचार तरुणांनी आत्मसात करुन येणाऱ्या भविष्यातील पिढीसाठी उज्वल प्रगत समाज निर्माण करावा, असे प्रतिपादन केले. उपस्थित मान्यवरांनी या समाजप्रबोधन कार्यक्रमात समाजबांधवांना मार्गदर्शन केले. भाजयुमोचे कुलदीप लांजेवार यांनी महापुरुषांच्या पुतळ्याचे फक्त अनावरण करुनच चालणार नाही तर त्यांच्या प्रतिमेचे दर्शन करुन त्यांचे विचार अंगिकृत करुन महापुरुषांना अपेक्षित असणारा समाज निर्माण करण्याचे कार्य आजच्या तरुण पिढीने केले पाहिजे, असे सांगितले. प्रास्ताविक तंटामुक्त समिती अध्यक्ष भाष्कर निकोडे यांनी मांडले. संचालन नागेश्वर निकोडे यांनी केले. आभार उत्तम निकोडे यांनी केले. कार्यक्रमासाठी महात्मा ज्योतिबा फुले माळी महासंघ, सावित्रीबाई फुले महिला आघाडी समिती, नवगाव माळी समाज संघटना घोनाडीच्या सर्व सभासद व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी )