शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणुका घेऊ नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:36 IST

सालेकसा : महानगरपालिका, नगरपालिका आणि नगर पंचायतीच्या आगामी निवडणुका तसेच जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका ओबीसी समाजाला आरक्षण न ...

सालेकसा : महानगरपालिका, नगरपालिका आणि नगर पंचायतीच्या आगामी निवडणुका तसेच जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका ओबीसी समाजाला आरक्षण न देताच घ्यायच्या असल्याने राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजू प्रभावीपणे मांडली नाही. मात्र, ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणुका घेऊ नयेत, अशी मागणी भाजप तालुका शाखेच्यावतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली.

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार नाहीत, असे वारंवार सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आरक्षण टिकविण्यासाठी काहीही हालचाल केलेली नाही. गेले सहा महिने आघाडी सरकार ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाबद्दल टाळाटाळ करीत आहे. ओबीसी समाजाचा इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी तातडीने कार्यवाही सुरू करा, असे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्त्वाने राज्य सरकारला सांगितले आहे. मात्र, आघाडी सरकारने गेल्या सहा महिन्यात काहीच हालचाली केल्या नाहीत. इम्पिरीकल डेटा गोळा करण्यासाठी नेमलेल्या मागासवर्गीय आयोगाला आघाडी सरकारने निधीच दिला नाही. या हलगर्जीपणाचा परिणाम ओबीसी आरक्षणाशिवाय जिल्ह्यातील जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली. ओबीसी समाजाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या आघाडी सरकारचा आम्ही निषेध करतो. ओबीसी आरक्षणाशिवाय येणाऱ्या कोणत्याही निवडणुका घेण्याचे ठरविले तर भारतीय जनता पार्टी मंडल सालेकसाद्वारे राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करेल, याची नोंद घ्यावी. ओबीसींना आरक्षण मिळाल्यानंतर पुढील निवडणुका घ्याव्यात, अशी विनंती निवेदनातून करण्यात आली. शिष्टमंडळात तालुका भाजप अध्यक्ष गुणवंत बिसेन, माजी अध्यक्ष परसराम फुंडे, युवा मोर्चा अध्यक्ष आदित्य शर्मा, महामंत्री देवराम चुटे, गौरीशंकर बिसेन, संजू कटरे, मनोज इळपाते, भाऊलाल शिवणकर, गुमानसिंह उपराडे यांचा समावेश होता.