शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

चिल्लर नाही, चॉकलेटच घ्या

By admin | Updated: May 25, 2015 01:20 IST

शहरातील अनेक दुकानांमध्ये चिल्लरवरून वाद होताना आपण नेहमी पाहतो.

गोंदिया : शहरातील अनेक दुकानांमध्ये चिल्लरवरून वाद होताना आपण नेहमी पाहतो. कारण दुकानदार आणि ग्राहकांचा पुन्हा संबंध येणार नसतो आणि इमेजचाही प्रश्न नसल्यामुळे असे प्रकार घडतात; पण महाविद्यालयात असे प्रकार घडत नाहीत. त्यामुळे कॉलेज परिसरातील कँटीनचालक त्याचा फायदा घेऊन विद्यार्थ्यांना चिल्लर न देता टोकन अथवा चॉकलेट देऊन आपला फायदा आणि विद्यार्थ्यांची लूट करीत आहेत, असा प्रकार 'तेरी भी चूप मेरी चूप' या पद्धतीने सुरू आहे. शहरातील बहुतांश दुकानांतून कोणत्याही वस्तू घेतल्यास चिल्लर मागितली जाते. ग्राहकाने आठ रुपयांची वस्तू खरेदी केल्यास दोन रुपये परत न करता त्याऐवजी दोन रुपयांचे दोन चॉकलेट अथवा टोकन दिले जाते. विशेषत: मोबाईल रिचार्ज करणारे, अशी युक्ती वापरताना दिसून येतात. एखाद्या ग्राहकाने चिल्लर देण्याची मागणी केल्यास त्यालाच चिल्लर आणून द्या, असे सांगितले जाते. काही विक्रेते तर ग्राहकांसोबत चिल्लर देण्यावरून वाद घालत असतात. आमच्याकडे चिल्लर बनविण्याचा कारखाना आहे काय, असा प्रतिप्रश्न ग्राहकालाच करतात. महाविद्यालयात कँटीनमध्ये चिल्लरवरून वाद घातल्यास मित्र-मैत्रिणी काय म्हणतील, या भीतीमुळे तरुण चिल्लर मागत नाहीत. त्याचा फायदा कँटीनचालक घेत आहेत. कँटीनमध्येच नाही तर महाविद्यालयाच्या परिसरात असणाऱ्या हॉटेल आणि पानटपऱ्यांमध्ये चिल्लर न देता टोकन दिले जात आहेत. विशेष म्हणजे चिल्लर पैसे असतानाही विद्यार्थ्यांची लूट केली जात आहे. विद्यार्थ्यांच्या लुटीमागचे कारण विद्यार्थ्यांनी दुसऱ्या हॉटेल, टपरीवर जाऊन खरेदी करू नये म्हणून काही व्यावसायिक मुद्दाम टोकन देतात. विद्यार्थी टोकन जवळ असल्यामुळे पुन्हा त्याच हॉटेल अथवा पानटपरीवर जातात, अशा प्रकारे दुकादारांचा ग्राहक इतरत्र जाक नसून त्यांचा फायदा होतो. (तालुका प्रतिनिधी)