शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

नितीनचा अपघात की हत्या?

By admin | Updated: April 23, 2016 01:46 IST

आपल्या सवंगड्यासोबत खेळायला गेलेला तीन वर्षीय नितीन तब्बल २९ तासांनी घरा जवळील विहिरीमध्ये मृतावस्थेत आढळला.

शंकेला पेव फुटले : मृत शरीरावर आढळल्या जखमा बोंडगावदेवी : आपल्या सवंगड्यासोबत खेळायला गेलेला तीन वर्षीय नितीन तब्बल २९ तासांनी घरा जवळील विहिरीमध्ये मृतावस्थेत आढळला. घटनेला पंधरवाडा उलटला असला निश्चित माहितीअभावी विविध चर्चेचे पेव फुटले आहे.याबाबत गावातील चर्चेवरून मिळालेल्या माहितीनुसार येथील विलास पुस्तोडे यांचा एकुलता एक ३ वर्षाचा मुलगा नितीन १ एप्रिल रोजी १०.३० वाजता आईला सांगून घराजवळच्या मंदिर परिसरात आपल्या संवगड्या सोबत खेळायला गेला. त्याची आई चंद्रकला आंघोळ केल्यानंतर जेवणासाठी आपल्या बाळाला बोलावण्यासाठी १०.४५ वाजता गेली. मंदिर परिसरात मुलगा दिसत नाही म्हणून समोरच्या चौकात गेली. आपला पोटचा गोळा अचानक कुठे गेला. या विवंचनेत पडून त्या मातेने अख्या गाव पिंजून काढला. दिवस उलटला तरी नितीनचा पत्ता नाही. नातलगाच्या मदतीने अखेर त्या मातेने अज्ञात इसमाने पळवून नेल्याची तक्रार अर्जुनी-मोरगाव पोलीस स्टेशन येथे केली. पोलिसांनी घराशेजारील विहीर व गावाजवळील तलाव पिंजून काढला. परंतु नितीनचा पत्ता लागला नाही. विहीरीमध्ये अनेकदा गळ टाकून पाहण्यात आला. गळाला काहीच लागले नाही. २ एप्रिल रोजी दुपारी ३.३० ते ४ वाजता दरम्यान त्याच विहीरीमध्ये नितीनचा प्रेत आढळून आला. प्रेत बाहेर येताच अनेकांनी विविध शंका केल्या. डाव्याबाजूला कपाळावर मोठी जखम व नाकावर रक्ताचे डाग स्पष्ट दिसत असल्याने २९ तास पाण्यातील प्रेत असताना जखमा मिटलेल्या अवस्थेत दिसून येत नव्हत्या. त्या विहीरीमध्ये १ तारखेला कित्येकदा गळ टाकून पाहण्यात आले. परंतु हाती काहीच लागले नाही. २ एप्रिल ४ वाजे ज्या विहीरीमधून नितीनचे प्रेत निघाले. २९ तासापासून बेपत्ता झाल्याचे नितीनचे प्रेत विहीरी बाहेर काढल्यानंतर ताजेतवाने होते. नितीनच्या मृतदेहावर पाण्याचा प्रभाव, दिसून येत नव्हता असेही दर्शकांकडून सांगण्यात येत होते. घराजवळच विहीर असताना नितीन एकटा विहीरीकडे कधी गेला नाही असे घरच्या लोकांच्या चर्चेवरून समजते. विहीरीमध्ये पडल्यानंतर नितीनच्या कपाळाला खोल अशी मोठी जखम कशी पडली. या घटनेला २० दिवस होऊन सुध्दा अजून पावेतो कोणता निष्कर्ष निघाला नाही. गावात सुरू असलेल्या चर्चेवरून नितीनला ठार मारून नंतर काही वेळाने विहीरीमध्ये टाकण्यात तर आले नाही ना? अशी शंका येते. मंदिरा शेजारील एका अल्पवयीन मुलींचे घटनेच्या दिवशी १२.३० वाजताच्या दरम्यान नितीनचा रडण्याचा आवाज ऐकल्याचे बोलल्या जाते. याचा खोलात जाऊन तपास केला तर काही धागेदोरे निश्चित गवसतील अशी जनमानसात चर्चा आहे.(वार्ताहर)