शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
‘माझा मुलगा वर्षावर मला भेटायला टॅक्सीने यायचा’; पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळातील किस्सा सांगितला
3
नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ६ विश्वासार्ह गुंतवणूक योजना; तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाहीत
4
बांगलादेशात खळबळ! १७ वर्षांनंतर तारिक रहमान मायदेशी परतले; येताच मोहम्मद युनूस यांना केला फोन!
5
संपादकीय: पुन्हा चुकू अन् फुटू नका, राज-उद्धव आणि भाजप...
6
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
7
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
9
पीछेहाट कम्युनिस्ट पक्षाची, विचारसरणीची नव्हे!
10
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
11
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
12
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
13
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
14
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
15
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
16
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
17
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
18
डिलिव्हरी बॉयची कमाई किती? पाच वर्षांत कमविले दीड कोटी...
19
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
20
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

तंटामुक्त समित्यांनी मिटविले नऊ लाख फौजदारी तंटे

By admin | Updated: September 4, 2014 23:54 IST

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीमेंतर्गत राज्यात सामोपचाराने मिटविण्यात आलेल्या तंट्यामध्ये सर्वाधिक प्रमाण फौजदारी स्वरूपाच्या तंट्याचे आहे. सर्वात कमी प्रमाण महसूली तंट्याचे आहे.

गोंदिया : महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीमेंतर्गत राज्यात सामोपचाराने मिटविण्यात आलेल्या तंट्यामध्ये सर्वाधिक प्रमाण फौजदारी स्वरूपाच्या तंट्याचे आहे. सर्वात कमी प्रमाण महसूली तंट्याचे आहे. सुरूवातीपासून तब्बल नऊ लाख ११ हजार ४१९ फौजदारी तर ३३ हजार ३९९ महसूली स्वरूपाचे तंटे मिटविण्यात आले आहे. शिवाय दिवाणी स्वरूपाचे ६८ हजार २५५ तंटे मिटले आहेत. सामोपचाराने मिटणाऱ्या तंट्यामुळे न्यायालयांवरील भार हलका झाला आहे, असे गृहखात्याने आपल्या अहवालात जाहीर केले. तंटामुक्त गाव मोहीम यशस्वी ठरल्याचा दावाही केला आहे. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम १५ आॅगस्ट २००७ पासून सुरू झाली. त्यानंतर संपूर्ण मोहीम महाराष्ट्रात एक चळवळ म्हणून उभी राहीली आहे. पैसा आणि वेळेची बचत करू शकणाऱ्या या तंटामुक्त गाव मोहीमेचे सर्वानीच स्वागत केले आहे. मोहीम यशस्वीपणे राबविली गेली.गावागावात तंटामुक्त गाव समित्या स्थापन झाल्या आहेत. तंटे गावातल्या गावात मिटू लागल्याने तंटामुक्त गाव समितीला गावात मानाचे स्थान मिळू लागले आहे. वर्षानुवर्षे न्यायालयात प्रलंबित असलेले दावेही तंटामुक्तीच्या माध्यमातून सुटू लागले आहे. त्यामुळे तंटामुक्त गाव मोहीमेची संकल्पना सर्वानाच पटली. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेचे सध्या सहावे वर्ष सुरू आहे. तत्पूर्वी प्रारंभीच्या चार वर्ष मिटलेल्या तंट्याची आकडेवारी गृहखात्याने जाहीर केली आहे. या चार वर्षाचा आढावा घेतल्यास सामोपचाराने मिटणाऱ्या तंट्यामुळे न्यायालयावरील भार काही अंशी हलका झाल्याचे गृहखात्याच्या लक्षात आल्याचेही म्हटले आहे. गावामध्ये अस्तित्वात व नव्याने निर्माण होणारे तंटे सामोपचाराने मिटविण्याच्या उद्देशाने राबविल्या जाणाऱ्या या मोहिमेत आतापर्यंत एकूण १० लाख ७५ हजार ५३१ वेगवेगळया स्वरूपाचे तंटे मिटविण्यात यश मिळाले आहे. या मोहिमेत फौजदारी प्रक्रिया संहीता १९७३ कलम ३२० मध्ये नमूद केलेले दखलपात्र गुन्हे मिटवता येतात. तसेच अदखलपात्र गुन्हेही मिटविता येतात. याशिवाय महसूली, दिवाणी व इतर तंटे सामोपचाराने मिटविण्याची विशिष्ट कार्यपध्दती निश्चित करून देण्यात आली आहे. आजपर्यंत या मोहिमेअंतर्गत ग्रामीण भागात मिटलेल्या तंट्यामध्ये सर्वाधिक प्रमाण फौजदारी तंट्याचे असल्याचे दिसून येते. मोहिमेच्या पहिल्या वर्षी म्हणजे २००७-०८ मध्ये २ लाख ७ हजार ११५ तंटे, २००९-१० मध्ये २ लाख १८ हजार ८१३ तंटे, तर २०१०-११ मध्ये २ लाख २५ हजार ३०२ व त्यांनतर एक लाखापेक्षा अधिक फौजदारी तंटे मिटविण्यात आले आहेत. याच कालावधीत दिवाणी स्वरुपाचे तंटे पहिल्या वर्षी २०,६६३, दुसऱ्या वर्षी १०,२२५, तिसऱ्या वर्षी १४,६९९ आणि चौथ्या वर्षी १६,८५७ तर महसुली स्वरूपाचे तंटे पहिल्या वर्षी ८,३४७, दुसऱ्या वर्षी ६,६५७, तिसऱ्या वर्षी ८,५५७ आणि चौथ्या वर्षी ९,८३८ सामोपचाराने मिटविण्यात आले आहेत. त्याशिवाय सहकार क्षेत्रातील २८,४९२ कामगार कार्यक्षेत्रातील १५,१८१, औद्योगिक क्षेत्रातील १३,२७२ आणि इतर ११,३०२ तंटे मिटविण्यात आले आहे. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिम सुरू झाल्यापासून गेल्या चार वर्षात ९ लाख ७५ हजार ५३१ तंटे मिटविण्यात आले. त्यात ९ लाख १८ हजार ४१९ फौजदारी तंटे मिटविण्यात आले आहे. वेळ, पैसा व त्रास वाचविण्याचे काम तंटामुक्त समितीने केले. मोहीमेने न्यायालयाचा कामाचा भार कमी केला. तंटामुक्त गाव मोहीम निश्चितपणे फलदायी ठरल्याचे तसेच ही मोहीम यापुढेही सुरू ठेवण्यात येणार असल्याचे गृहखात्याने म्हटले आहे. (तालुका प्रतिनिधी)