शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

आज लागणार नऊ लाख रोपटे

By admin | Updated: July 1, 2016 01:41 IST

राज्यभर दोन कोटी वृक्ष लावण्याचा कार्यक्रम १ ते ७ जुलैदरम्यान राबविला जात आहे. यात गोंदिया जिल्ह्याला ९ लाख ६१ हजार ६९० रोपटे लावण्याचे लक्ष्य देण्यात आले आहे.

सर्व विभाग सज्ज : १६ हजार ९१२ अधिकारी-कर्मचारी व नागरिक होणार सहभागीगोंदिया : राज्यभर दोन कोटी वृक्ष लावण्याचा कार्यक्रम १ ते ७ जुलैदरम्यान राबविला जात आहे. यात गोंदिया जिल्ह्याला ९ लाख ६१ हजार ६९० रोपटे लावण्याचे लक्ष्य देण्यात आले आहे. शुक्रवार, १ जुलै रोजी जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या वृक्षलागवडीसाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. यात १६ हजार ९१२ अधिकारी-कर्मचाऱ्यांसह विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होत आहेत.गोंदिया वनविभाग, सामाजिक वनीकरण विभाग, वनविकास महामंडळ, नवेगांव-नागझिरा वन्यजीव अभयारण्य आणि इतर यंत्रणा मिळून हा वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वी बनविण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.हरित महाराष्ट्र-समृद्ध महाराष्ट्रचा नारा राज्य सरकारने दिला. त्यानुसार वन महोत्सव २०१६ अंतर्गत जिल्ह्यात ९ हजार ६१ हजार ६९० वृक्ष लागवड केली जाणार आहे. रोपट्यांना नर्सरीमधून वनपरिक्षेत्र कार्यालयात पोहोचविण्यात आले असून गेल्या चार दिवसांपासून रोपांचे वितरण विविध विभागांना केले जात आहे. गोंदिया तालुक्यासाठी कुडवा नाका परिसरातील वनपरिक्षेत्र कार्यालयातून रोपांचे वितरण सतत सुरू आहे. जवळपास सर्व वृक्षारोपणाच्या ठिकाणी हे रोपटे पोहोचविण्यात आले आहे.या वृक्षारोपणासाठी वनविभाग गोंदियाला सर्वाधिक लक्ष्य देण्यात आले आहे. त्यांना ७ लाख ४८ हजार रोपांची लागवड करायची आहे. सामाजिक वनीकरण गोंदिया विभागाला २५ हजार रोपट्यांचे लक्ष्य आहे. तसेच वनविकास महामंडळाला ३१ हजार ८००, नवेगांव-नागझिरा वन्यजीव विभागाला २६ हजार ५९३, तसेच इतर यंत्रणांना १ लाख १५ हजार ९५० रोपटे लागवडीचे लक्ष्य देण्यात आले आहे. संबंधित विभागांनी त्यानुसार खड्डेही खोदले आहेत. कोणी कुठून रोपटे घ्यायचे याचेही नियोजन आधीच करण्यात आले होते. त्यानुसार वनविभाग गोंदियाने मुरदोली आणि मालकनपूर येथील रोपवनातून ५०-५० हजार रोपटे उचलले. सामाजिक वनीकरण गोंदियाने कुडवा येथून २५ हजार, गोंडमोहाडी येथून २३ हजार ६७२, आमगाव तालुक्यातील किकरीपार येथून १७ हजार १८९, देवरी येथून ३ हजार ७६५, भागी येथून २३ हजार ६००, सडक अर्जुनी तालुक्याने १२ हजार ३०५, माहुरकुडा येथून ५ हजार ३८० आणि निमगांव रोपवन येथून ३१ हजार ७५० रुपये संबंधित यंत्रणांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. कृषि विभागाने हिवरा येथील कृषि फार्म मधून ३० हजार २१५ रोपटे उपलब्ध करण्यात आले आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)माहिती कार्यालय व पत्रकारांचाही सहभागजिल्हा माहिती कार्यालय व पत्रकार बांधवांच्या संयुक्त विद्यमाने वृक्ष लागवडीचा कार्यक्र म १ जुलै रोजी सकाळी ७.३० वाजता नवीन जिल्हा क्रीडा संकुलासमोर, पवार गुरूजी यांच्या फार्म हाऊस जवळ आयोजित करण्यात आला आहे. यावेळी आंबा, पेरु, जांभूळ, कदंब, निंब, गुलमोहर या जातीची २५ रोपटे लावण्यात येणार आहे. पत्रकारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी केले आहे.पावसाच्या हजेरी जीव पडला भांड्यातजिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लाखो रोपटे लावले जाणार असले तरी पाऊसच नसल्यामुळे हे रोपटे जगणार तरी कसे? असा प्रश्न गुरूवारी सायंकाळपर्यंत सर्वांना पडला होता. मात्र रात्री ८ वाजताच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. यामुळे शुक्रवारी होणाऱ्या वृक्षारोपणातील झाडे किमान आठवडाभर तरी पाण्याशिवाय राहू शकतील, असा दिलासा मिळाला आहे.३१८ सभांमधून जनजागृतीजिल्ह्यात हा वृक्षलागवडीचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ९ चित्ररथ काढण्यात आले. ९१ पथनाट्य आणि कलापथक कामी लावण्यात आले. तसेच ३१८ सभा घेऊन प्रचार-प्रसार करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.