शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

नवजात मुलगी हलगर्जीपणामुळे दगावली

By admin | Updated: June 4, 2016 01:40 IST

प्रसूतीनंतर सतत तीन दिवस नवजात मुलीला ताप येत असताना तिला वेळेवर योग्य उपचार न मिळाल्याने तसेच गोंदियाला वेळेवर रेफर न केल्यामुळे मुलगी दगावली.

कुटुंबीय संतप्त : गावकऱ्यांचा डॉक्टरवर रोषसालेकसा : प्रसूतीनंतर सतत तीन दिवस नवजात मुलीला ताप येत असताना तिला वेळेवर योग्य उपचार न मिळाल्याने तसेच गोंदियाला वेळेवर रेफर न केल्यामुळे मुलगी दगावली. त्यामुळे कावराबांध येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजू रघटाटे यांच्यावर योग्य कारवाई केल्याशिवाय नवजात मुलीचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा संताप मुलीच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला. त्यांच्या समर्थनात गावकरीसुध्दा आरोग्य केंद्रात धडकले. त्यामुळे कावराबांध येथे चार तास तणावाचे वातावरण होते.कावराबांध येथील चरणदास राजाराम हटवार यांनी १ जून रोजी पत्नी टिकेश्वर चरणदास हटवार हिला प्रसूतीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र कावराबांध येथे दाखल केले. काही वेळात महिलेची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी गर्भात मूल व्यवस्थित नसून त्याला गोंदियाला घेऊन जावे असा सल्ला दिला. परंतु तेवढ्यात कावराबांध उपकेंद्रातील आरोग्य सेविकेशी संपर्क केला असता तिने मातेची तपासणी करू न प्रसूती सामान्य होणार आहे असे सांगितले. आरोग्य सेविकेच्या म्हणण्यानुसार प्रसूती सामान्य होऊन मातेने एका गोडस मुलीला जन्म दिला. मात्र सकाळी ७.५० वाजता जन्म झालेल्या मुलीला काही वेळातच ताप आला. त्यावर डॉक्टरने औषधोपचार केला. परंतु दुसऱ्या दिवशी पुन्हा ताप आला. तेव्हा पुन्हा औषधोपचार केल्याचे सांगण्यात आले. तिसरा दिवस लोटला तरी ताप उतरला नाही. सकाळी आईला-मुलीसह गोंदिया रेफर करण्यात आले. परंतु आरोग्य केंद्राचे गाडी चालक हजर नव्हते. डॉक्टरने गाडी चालकाशी संपर्क केला केला. सकाळी ८ वाजेपासून चालकाने कर्तव्यावर असायला पाहिजे. परंतु चालक १० वाजता आरोग्य केंद्रात आला. तत्पूर्वीच ती नवजात मुलगी दगावली. या सर्व प्रकारामुळे हटवार कुटुंबीयांसह इतर गावकरीही संतापले व प्राथमिक आरोग्य केंद्राकडे धाव घेतली. डॉक्टर आणि गाडी चालकावर कारवाई झाल्याशिवाय मृत मुलीला दवाखान्यातून नेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतले. तालुका वैद्यकीय अधिकारी सी.डब्ल्यू.वंजारे यांनी दोन्ही बाजू ऐकून घेत चालकाला कार्यमुक्त करण्याचे आदेश काढायला लावले.