शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

नववर्षात जिल्ह्यात पडली १०९२ बाधितांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:28 IST

गोंदिया : कोरोनाने पुन्हा एकदा पाय पसरण्यास सुरुवात केली असून जिल्ह्यातील बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असताना दिसत आहे. फेब्रुवारी ...

गोंदिया : कोरोनाने पुन्हा एकदा पाय पसरण्यास सुरुवात केली असून जिल्ह्यातील बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असताना दिसत आहे. फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाचा हा उद्रेक दिसत असला तरी नववर्षात जिल्ह्यात १०९२ बाधितांची भर पडली आहे. मात्र, आता परिस्थिती पुन्हा चिघळत चालली असल्याचे दिसत आहे.

सन २०२० मध्ये मार्च महिन्यातच कोरोना देशात शिरला होता व अवघ्या देशाला हेलावून सोडले होते. वर्षभर कोरोनातच गेला होता व दिवाळीनंतर रुग्णसंख्या आटोक्यात येत असताना दिसत होती. त्यानंतर रुग्णसंख्या घटत गेल्याने दिलासा मिळाला होता. अशात डिसेंबर महिन्यात केंद्र शासनाने देशातीलच २ लसींना मंजुरी दिल्यानंतर नववर्षात १६ जानेवारीपासून अवघ्या देशात लसीकरणाला सुरुवात झाली. नववर्षातील हा जानेवारी महिना दिलासा देणारा ठरला असतानाच फेब्रुवारी महिन्यात पुन्हा एकदा राज्यात कोरोनाचा उद्रेक सुरू झाला आहे. बघता-बघता फेब्रुवारी महिना गेला व मार्च महिन्यात कोरोनाने आपले पाय पसरण्यास सुरुवात केली असून बाधितांच्या संख्येत भर पडू लागली आहे. नववर्षातील मार्च महिन्यातील १६ तारखेपर्यंतची आकडेवारी बघितल्यास जिल्ह्यात १०९२ बाधितांची भर पडली आहे. यामध्ये जानेवारी महिन्यात ४६९, फेब्रुवारी महिन्यात २४२ तर मार्च महिन्यातील १६ तारखेपर्यंत ३८१ नवीन बाधितांची नोंद घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे, नववर्षातील आतापर्यंत काळ चांगला गेला. मात्र, आता राज्यात दुसरी लाट आल्याचे बोलले जात असल्याने व बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने पुढचा काळ मात्र कठीण दिसून येत आहे.

----------------------------

१५ दिवसांत ३८१ बाधितांची नोंद

जिल्ह्यात जानेवारी महिन्यात ४६९ तर फेब्रुवारी महिन्यात २४२ बाधितांची नोंद घेण्यात आली आहे. असे असतानाच मात्र मार्च महिन्यात १६ तारखेपर्यंत ३८१ बाधितांची नोंद घेण्यात आली आहे. एकंदर मार्च महिन्यातील या अर्ध्या दिवसांत ३८१ बाधितांची भर पडली असून बाधितांची संख्या वाढत चालली असताना आता पुढे मात्र आणखी किती रुग्ण वाढतात हे सांगणे कठीण आहे.

----------------------------

खबरदारी बागळणे गरजेचे

कोरोनाचा वाढता उद्रेक बघता शासनाकडून नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र, नागरिकांकडून आता कोरोनाला विसरून आपला मनमर्जीपणा सुरू आहे. मास्क न लावता फिरणे, शारीरिक अंतराचे पालन न करणे असे प्रकार सर्रास सुरू आहेत. मात्र, या निष्काळजीपणामुळेच कोरोनाला पुन्हा एकदा पाय पसरण्यास वाट मिळाली असून हा प्रकार धोक्याचा ठरत आहे.