शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

७ फेब्रुवारीपासून नवीन कार्यकाळ

By admin | Updated: January 18, 2017 01:14 IST

विद्यमान नगराध्यक्ष व सदस्यांचा कार्यकाळ येत्या ६ फेबुवारी रोजी संपणार असून ७ फेब्रुवारी पासून नवनिर्वाचित अध्यक्ष व सदस्यांचे नवे सत्र सुरू होणार आहे.

गोंदिया : विद्यमान नगराध्यक्ष व सदस्यांचा कार्यकाळ येत्या ६ फेबुवारी रोजी संपणार असून ७ फेब्रुवारी पासून नवनिर्वाचित अध्यक्ष व सदस्यांचे नवे सत्र सुरू होणार आहे. त्यामुळे नवनिर्वाचितांना आणखी काही दिवसांची वाट बघावी लागणार आहे. विशेष म्हणजे नवनिवार्चित नगराध्यक्षांसह सदस्यांच्या पदग्रहणासाठीची तयारी सुरू असल्याची माहिती आहे. प्राप्त माहितीनुसार, नगर परिषदेची मागील निवडणूक डिसेंबर २०१२ मध्ये पार पडली होती. मात्र त्यांचा कार्यकाळ ६ फेब्रुवारी पासून सुरू झाला होता. त्यामुळे आता येत्या ६ फेब्रुवारी पर्यंत त्यांचा कार्यकाळ राहणार असून त्यानंतर तो संपुष्टात येणार आहे. अशात ७ फेब्रुवारीपासून नवनिर्वाचित नगराध्यक्ष व सदस्यांचा कार्यकाळ सुरू होणार आहे. त्यामुळे आता या सर्वांना येत्या ७ फेब्रुवारी पर्यंतची वाट बघावी लागणार आहे. मागील निवडणूक एका प्रभागातून चार सदस्य या पद्धतीने घेण्यात आली होती. तर नगराध्यक्षांची निवड ही सदस्यांतूनच करण्यात आली होती. यंदा मात्र शहरातील एक प्रभाग वाढवून घेत प्रभागातून दोन सदस्य या पद्धतीने ही निवडणूक झाली. तर नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडण्यात आले. नगराध्यक्ष थेट निवडीचा हा दुसरा प्रयोग आहे. त्यामुळे यंदा ४२ सदस्यांसह नगराध्यक्षांची थेट निवडणूक झाली. या निवडणुकीचे निकाल ९ जानेवारी रोजी जाहीरही झालेत. मात्र विद्यमान अध्यक्ष व सदस्यांचा कार्यकाळ संपण्यासाठी ७ तारखेची वाट बघावी लागणार आहे. (शहर प्रतिनिधी) पदग्रहण समारंभाची तयारी यंदा निवडून आलेल्या नगराध्यक्ष व सदस्यांच्या पदग्रहणासाठी जाहीर समारंभाचे आयोजन केले जात असल्याची माहिती आहे. यात काही मंत्र्यांसह अन्य जनप्रतिनिधींची उपस्थिती राहणार आहे. मात्र या सर्वांच्या तारखा स्पष्ट होत नसल्याने या जाहीर समारंभाची नेमकी तारीख स्पष्ट नाही. त्यामुळे आता हा समारंभ कधी होतो हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होणार असल्याची माहिती आहे.