शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

पंचायत समिती सदस्यांचे नियोजनशून्य प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2017 01:10 IST

जि.प.अध्यक्ष येण्याआधीच अधिकाऱ्यांना दीप प्रज्वलन करुन घेण्याची घाई का झाली? प्रशिक्षकच हजर नसताना

भोंगळ कारभार : जिल्हाभरातून आलेल्या पंचायत समिती सदस्यांची नाराजी पदाधिकाऱ्यांनाही महत्त्व नाही जि.प.अध्यक्ष येण्याआधीच अधिकाऱ्यांना दीप प्रज्वलन करुन घेण्याची घाई का झाली? प्रशिक्षकच हजर नसताना अधिकाऱ्यांनी केवळ औपचारिकात पूर्ण करून पं.स.सदस्यांना ताटकळत का ठेवले? अध्यक्ष हे जि.प.चे सर्वोच पद असताना त्यांचे स्वागत करण्यासाठीही संबंधित अधिकारी हजर नसणे हा त्यांचा अपमान नाही का? अशी कुजबूज पं.स.सदस्यांमध्ये सुरू होती. आम्हाला बोलावलेच कशाला? जिल्हा परिषद सदस्यांचे अधिकार व कर्तव्य या विषयावर बोलण्यासाठी गडचिरोलीच्या माजी जि.प. सदस्य कुसूम आत्राम यांनी थोडीफार माहिती दिली. मात्र नंतर विषयांतर होऊन त्यांचे मार्गदर्शन दुसरीकडे भरकटले. नंतर जिल्हा परिषदेचे उत्पन्न व खर्चाच्या बाबी विषयावर बोलण्यासाठी मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांनी आपला प्रतिनिधी पाठविला. मात्र त्या प्रतिनिधीकडे अपुरी माहिती असल्याचे जाणवल्याने त्यांना सदस्यांकडून प्रतिसाद मिळाला नाही. यावेळी अनेक सदस्यांनी बाहेर जाणे पसंत केले. अशा नियोजनशून्य कारभारावर नाराज झालेल्या पं.स.सदस्यांनी शेवटी तेथून काढता पाय घेत आम्हाला अशा प्रशिक्षणाला बोलावलेच कशाला? अशी प्रतिक्रिया देऊन तीव्र नाराजी व्यक्त केली.