शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया जिल्ह्यातील लसीकरण केंद्रात हलगर्जीपणा; महिलेला एकाचवेळी दिले लसीचे दोन डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 15:31 IST

गोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र चोपा अंतर्गत येणाऱ्या ग्राम गिधाडी येथील जिल्हा परिषद शाळेत मंगळवारी (दि.१८) ग्रामपंचायतच्या माजी सदस्य अनुसया केवलचंद पारधी (६२) यांना आरोग्य सेविका मेश्राम यांनी अनावधानाने एकापाठोपाठ दोन डोस दिले.

ठळक मुद्देमहिलेची प्रकृती सामान्य, मात्र १५ दिवसांत दिसणार परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया: गोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र चोपा अंतर्गत येणाऱ्या ग्राम गिधाडी येथील जिल्हा परिषद शाळेत मंगळवारी (दि.१८) कोव्हॅक्सिनचा पहिला डोस लावण्यासाठी लसीकरण केंद्र लावण्यात आले होते. यावेळी ग्रामपंचायतच्या माजी सदस्य अनुसया केवलचंद पारधी (६२) यांना आरोग्य सेविका मेश्राम यांनी अनावधानाने एकापाठोपाठ दोन डोस दिले. या महिलेची प्रकृती सामान्य आहे, पण १५ दिवसांनंतर परिणाम दिसणार अशा तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यायाने मुलगा विजय पारधी घाबरला असून, पोलिसांत तक्रार करण्याची तयारी दाखविली आहे.कोविड-१९ च्या बचावाकरिता सरकारने ज्यांचे वय ४५ ते ६० वर्षे आहे अशा नागरिकांकरिता लसीकरणाची मोहीम सुरू केली आहे. यात प्राथमिक आरोग्य केंद्र चोपा अंतर्गत येणाऱ्या ग्राम गिधाडी येथील जिल्हा परिषद शाळेत मंगळवारी (दि.१८) दुपारी ३ वाजता लसीकरण केंद्र आयोजित करण्यात आले होते. यात गावातील महिला-पुरुष जिल्हा परिषद शाळेत एकत्र आले होते. लसीकरणाचा लाभ घेण्यासाठी ग्रामपंचायतच्या माजी सदस्य अनुसया पारधी यांना कोव्हॅक्सिनचा पहिला डोस देण्यात आल्यानंतर त्यांना शाळेतच थांबण्याचा सल्ला आरोग्य सेविका मेश्राम व तिलकवार यांनी दिला. त्यामुळे अनुसयाबाई शाळेत थांबल्या असता १० मिनिटांनी पुन्हा त्यांना आरोग्य सेविका मेश्राम यांनी बोलावून दुसरा डोस देण्याची तयारी केली. अनुसयाबाईंनी कोव्हॅक्सिनचा डोस घेतला आहे असे सांगितले, मात्र याकडे दुर्लक्ष करीत आरोग्य सेविकेने दुसरा डोस लावला. थोड्यावेळाने अनुसयाबाईंनी घरी जाऊन मुलगा विजय पारधी यास माहिती दिली.विजय पारधी यांनी शहानिशा करण्यासाठी हाताच्या खाद्यांची पाहणी केली असता इंजेक्शनचे दोन चिन्ह उमटलेले दिसले. त्यांनी शाळेत जाऊन यासंदर्भात आरोग्य सेविका मेश्राम यांना विचारणा केली असता त्यांनी उत्तर दिले नाही. पण वरिष्ठांना यासंदर्भात माहिती दिली. अनुसयाबाईंची प्रकृती स्थिर आहे की, काही वाईट परिणाम झाले का याची चाचपणी करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र चोपाचे वैद्यकीय अधिकारी व पथक पारधी यांच्या घरी गेले व तपासणी करून प्रकृती स्थिर असल्याचे सांगत मुख्यालयी परत गेले. लसीकरणाचा पहिला डोस घेतल्यानंतर १५ दिवसांत प्रतिकारशक्ती वाढण्यास सुरुवात होत असते. अनुसयाबाईंना एकाच वेळी दोन डोस आरोग्य सेविकेने लावल्याने काय परिणाम होईल याची भीती मुलगा विजय पारधी यांना आहे. निष्काळजीपणा करणाऱ्या आरोग्य सेविकेवर वरिष्ठांनी कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच १५ दिवसानंतर कोणते वाईट परिणाम होतात यासाठी पोलिसांत तक्रार दाखल करणार, अशी माहिती विजय पारधी यांनी दिली आहे.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस