शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
5
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
6
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
7
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
8
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
9
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
11
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
12
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
13
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
14
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
15
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
16
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
17
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
18
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
19
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
20
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष लागवडीसाठी ग्रामस्थांच्या सहकार्याची गरज

By admin | Updated: July 1, 2017 00:21 IST

दिवसेंदिवस जंगलात वृक्षतोड होत असल्याने गावकऱ्यांनी या वृक्षतोडीला आळा घालण्यासाठी वनविभागाला सहकार्य करावे.

एस.एन. पंधरे : दोन हजारांवर रोपटी लावणार लोकमत न्यूज नेटवर्क बोंडगावदेवी : दिवसेंदिवस जंगलात वृक्षतोड होत असल्याने गावकऱ्यांनी या वृक्षतोडीला आळा घालण्यासाठी वनविभागाला सहकार्य करावे. जंगल ही गावचीच संपत्ती आहे. जंगलामधील झाडांचे रक्षण करण्याची गावची जबाबदारी आहे. विविध उपयोगी वनस्पती व आल्हाददायक हवामान मानवाला जंगलापासून मिळते. गावकऱ्यांना रोजगारांची संधी जंगलापासून मिळते. जंगलाचे प्रमाण वाढावे व पोषक वातावरण निर्मितीसह प्रदूषणाला आळा बसण्यासाठी झाडे जगणे आवश्यक आहे. गावामध्ये निसर्गरम्य वातावरण निर्मितीसाठी गावकऱ्यांनी वृक्ष लागवडीसाठी पुढे यावे असे आवाहन क्षेत्र सहाय्यक एस.एन.पंधरे यांनी केले. बोदरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात वृक्ष लागवडीसाठी पूर्व तयारी करण्याच्या आयोजित बैठकीप्रसंगी गावकऱ्यांना ते मार्गदर्शन करीत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरपंच जयवंता झोळे होत्या. यावेळी वनरक्षक पी.टी. दहिवले, पो.पाटील यशवंत कापगते, नाशिक कापगते, वनसमितीचे अध्यक्ष भाष्कर कवरे, मनोज झोळे, पुरुषोत्तम बडोले, सोमा शहारे, सुखदेव राऊत, इस्तारी टेंभुर्णे, तेजराम झोळे, सतिश कावळे उपस्थित होते. यावेळी गावकऱ्यांना मार्गदर्शन करताना प्रभारी क्षेत्र सहायक पंधरे म्हणाले की, वृक्ष तोडीने मानवाला अनेक संकटांना पुढे जावे लागत आहे. झाडांची संख्या कमी झाल्याने पावसाचे प्रमाण कमी झालेले दिसत आहे. शुद्ध हवामानापासून मानव वंचित होत आहे. येणाऱ्या संकटांवर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यासाठी गावकऱ्यांनी स्वत:हून पुढे यावे, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. बोदरा येथे लोकांच्या सहभागातून झुडपी जंगल गट नं. २३७/२ मधील २ हेक्टर क्षेत्रात विविध प्रजाती २ हजार २०० वृक्षांची लागवड १ जुलै रोजी करण्यात येणार आहे. ४ कोटी वृक्ष लागवड अभियानांतर्गत येत्या १ जुलैला बोदरा येथे गावकऱ्यांच्या सहभागातून वृक्षारोपण केले जाणार आहे. गावकऱ्यांनी सहभागी व्हावे असे वनरक्षक पी.टी. दहिवले यांनी बैठकीत आवर्जुन सांगितले. संचालन वनसमितीचे अध्यक्ष भाष्कर कवरे यांनी केले.